आनंद ढोणे पाटील परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा तालूक्यातील ममदापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. येथील सोसायटीची निवडणूक दि १२ जून २०२२ रविवार रोजी सहकार कायद्यानूसार घेण्यात आली. या निवडणूकीत येथील शेतकरी सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत घेण्यात आल्या नंतर वैध मतप्रत्रिकेची जुळवाजूळवी करुन सर्व उमेदवार,मतदान प्रतिनिधी यांच्या समक्ष प्रत्यक्षात मतमोजणी केल्यानंतर निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये, शेतकरी विकास पॅनलचे संपूर्ण ११ उमेदवार यांचा सर्वाधिक मताधिक्याने विजय झाल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी जवादे, सचिव अशोक सातपूते यांनी घोषीत केला.
सदरील सोसायटी निवडणूकीत, सर्वसाधारण मतदारसंघातून काळबांडे अंगद हनवता ( मिळालेली मते १२४), काळबांडे आंबादास नारायण ( मिळालेली मते १२०), काळबांडे बबन तातेराव (मिळालेली मते ११९), काळबांडे बळीराम मुंजाजी (मिळालेली मते ११९), काळबांडे भागवत बालाजी (मिळालेली मते १२१), काळबांडे राम मुंजाजी (मिळालेली मते ११६), काळबांडे विठ्ठल सोपान (मिळालेली मते ११६), काळबांडे शिवाजी निळकंठी (मिळालेली मते ११६),
तर महिला प्रतिनिधी मतदार संघातून काळबांडे पार्वतीबाई मोतीराम ( मिळालेली मते १२५), काळबांडे लक्ष्मीबाई दत्तराव (मिळालेली मते १२४) तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून रणवीर दिक्षा संजय (मिळालेली मते १२८) हे उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना ६३ ते ६७ असी मते मिळाली आहेत. सर्वसाधारण मतदार संघातील मतफत्रीकेवर १९० सभासद मतदारांनी हक्क बजावला असून ८ मत पत्रिका अवैध आहेत, महिला प्रतिनिधी मतदार पत्रीकेवर १९६ सभासद मतदारांनी हक्क बजावला तर २ मतपत्रिका अवैध आहेत आणि अनुसूचित जाती जमाती मतदार संघात १९४ सभासद मतदारांनी हक्क बजावला असून ४ मतपत्रिका अवैध आहेत.
विजयी झालेल्या उमेदवारास गावातील सोसायटी शेतकरी सभासदांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य केल्यामुळे सर्व पॅनलप्रमूख, उमेदवार आणि सहकार्य करणा-या कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी सुभेच्छा दिल्या आसून विजयी उमेदवारांचा गावकरी व गणपूर येथील शेतक-यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी, विजयी उमेदवारांनी शेतक-यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असी ग्वाही दिली.