Home समाजकारण माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोरसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे...

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोरसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन…..

👉🏻या सोहळ्यास ग्रामिण \शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – पत्रकार तथा
गोर सेना शो.मी. तालुका प्रमुख
कृष्णा राठोड

हिमायतनगर |कृष्णा राठोड
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गोरसेना गोरसिकवाडी यांच्या वतीने व तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्यावर अधिराज्य गाजवणारे ,बंजारा समजाचे
हृदयसम्राट , हरितक्रांतीचे ,प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त गोर सेना शाखा हिमायतनगर यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा होणार आहे. दि.०२ जुलै २०२२ वार – शनिवार ठिक- ११:०० वाजता श्री.परमेश्वार मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून श्रीकांत राठोड सहसंयोजक ,गोरसिकवाडी ,(महाराष्ट्र राज्य) यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून रामराव जेमला राठोड हिमायतनगर, सुभाष आला राठोड,बालाजी फुलसींग राठोड,एडवोकेट दिलीप राठोड,आशिष सकवान पापाराव चव्हाण (गोरसेना जिल्हाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सत्कार सोहळया मद्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आई-वडिलांचे. तसेच कोविड काळातील कोविड योद्यां म्हणून देश हिताचे कार्य करणारे डॉ. दामोदर जेमला राठोड वैद्यकीय अधिकारी सरसम, डॉ.लक्ष्मण आडे (नाईक) वैद्यकीय अधिकारी हिमायतनगर,
डॉ. बाळासाहेब जाधव हिमायतनगर, डॉ. मनोहर राठोड, प्रकाश राठोड P.S.I., मोहन राठोड P.S.I. , केशव राठोड P.S.I. , रवींद्र जाधव (विद्युत सहायक) यांचे सत्कारमूर्ती म्हणून सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ता यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार होणार असल्याचे गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष लखन जाधव व हिमायतनगर गोरसेना तालुका अध्यक्ष- सुनील चव्हाण तसेच हिमायतनगर गोरसेना तालुका संयोजक – बदुसिंग जाधव कांडलिकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Previous articleनगरपंचायतीच्या मतदार यादीतील बोगस मतदार याद्यांची चौकशी करा..
Next articleसोसायटी सचिवाची प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपतालुका प्रमुखास मारहाण