Home Breaking News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ना जयंती निमित्त नाशिक मध्ये अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ना जयंती निमित्त नाशिक मध्ये अभिवादन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

31मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नाशिक मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सीबीएस बस स्थानका समोरील शिवाजी उद्यान मधील अहिल्यादेवीच्या पूतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभीवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमा आधी सर्व परिसराची स्वच्छता करण्यात येवुन सुशोभिकरन करुन नाशिक मधील तमाम नागरिकांच्या उपस्थितीत अहिल्यादेवीच्या सामाजिक, धार्मिक, प्रशासकीय अजरामर असलेल्या कार्याला सलामी देवुन अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन प्रसंगी अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सार्वजानिक सोहळा 2022 चे संयोजक दिगंबरभाऊ मोगरे ( शिवसेना महानगर संघटक )अहिल्यादेवी जन्मोत्सव सोहळयाचे प्रसिद्धधी प्रमुख हेमंत शिंदे ( अखिल भारतीय ओबीसी महासभा – नाशिक जिल्हा संघटक ) समाधान बागल ( सह संयोजक व प्रहार जिल्हा चिटणीस प्रहार जनपक्ष )मा. खंडेराव पाटील ( जेष्ठ समाज नेते )दत्तू भाऊ बोड़के (उ. महाराष्ट्र अध्यक्ष प्रहार ) सुनिताताई मोडक ( कल्याणी संस्था ग्रुप अध्यक्ष ) आदी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवीच्या पूतळयाला पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अण्णासाहेब सा पनार, ऋषिकेश शिंदे, वैभव रोकडे, श्याम गोसावी, संकेत शिंदे आदि पदाधिकारी व अनेक समाज बांधव व कार्यकर्ता हे उपस्तिथ होते.

Previous articleमा. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वाचविले अपघात ग्रस्तांचे प्राण
Next articleडिपीवरील लाईटमुळे शेळीचा मृत्यू.