सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी हिमात़नगर तालुक्यातील कारला गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या पिचोंडी गावात पाण्याआभावी महिलांचे हाल होत आहेत काही दिवसापूर्वी येथील बोर चे अधिग्रहण ग्रामपंचायत कडुन करण्यात आले पण अचानक पाणी संपल्यामुळे रात्री बे रात्री महीलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे पिचोंडी येथील उपसरपंच रोशन धनवे यांना येथील महीलांना विचारणा केली असता त्यांनी सरपंच यांच्याशी बोला असे सांगितले गावातील काही युवकांनी कारला – पिचोंडी चे सरपंच यांना विचारणा केली असता सरपंच कदम यांनी उडवा उडवीची उत्तर देत मला या विषयी काही माहीती नसल्याचे सांगितले पिचोंडी गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यास आम्ही कारला ग्रामपंचायत सह पंचायत समिती वर घागर मोर्चा असल्याचे पिचोंडी येथील नागरीकांनी व महिलांनी आमच्या भुमीराजा न्युज शी बोलतांना सांगीतले.