Home Breaking News मोबाईलंच्या विळख्यात पडली तरुणाई…. 👉 दृष्टिक्षेप

मोबाईलंच्या विळख्यात पडली तरुणाई…. 👉 दृष्टिक्षेप

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 07 आॅगष्ट 2022

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला असला तरी, त्यापासून मिळणारे फायदे जास्त आणि तोटे कमी काहीचे असु शकतात. पण एखाद्या तंत्रज्ञानातील घटकांचा वापर अति होत असेल तर, त्यापासून धोका निर्माण होतो. हल्ली काहीसे असेच झाले आहे. “मोबाईल” यामुळे अख्खे जग जवळ आले असले तरी, त्यांचा वापर अधिक वाढतांना दिसुन येतो. त्यामध्ये उद्याचे देशाचे भविष्य घडविणारे तरुणपिढी मात्र मोबाईलचा अतिवापर करत आहे.
” वेळ खराब असेल तर हळुहळु निघुन जाईल पण मात्र स्वःताचा मोबाईल खराब झाला तर वेळ निघणार नाही.” असंच म्हणावं लागेल. कारण सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रसंग असो आजचा तरुण असो, की ईतर नागरिक हे मोबाइलचा वापर करतांना दिसत आहेत. मोबाईल म्हणजे टाइमपास असेच काहीसे सुत्र निर्माण झाले आहे. पुर्वी वडीलधारी मंडळींना कामामध्ये अडथळा नको असायचा. आपण आपले काम चोख पध्दतीने करावे. असे आजोबा, पणजोबा सांगायचे….पण आज समाजातील कुठलाही सुखदुःखाच्या प्रसंगी लोक मोबाईल काढून रीकामा वेळ घालवतात. त्यामुळे हे वडीलधारी मंडळी पटत नाही. ते चांगले सांगण्याचा प्रयत्न नेहमी करतात. मात्र आजच्या तरुणाईला ते पटत नाही. रेल्वेने प्रवास करीत असलात तर समोरच्या शिटवर बसलेला व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती फार कमी, मोजकच बोलतात किंवा बोलतच नाहीत. खिशातून काढला मोबाईल की झाला टाईमपास सुरु….. डॉ. नेहमीच सांगत असतात मोबाईल अतिवापर टाळावा. कारण डोळयावर परीणाम होतो. पण कोण कोणाचे ऐकणार काही प्रश्न आहे. लहाना पासुन ते प्रोढा प्रयंत हे सरासरी मोबाईल वापर करीत आहेत.
तरुण पिढी ने मोबाईल अतिवापर केल्यास मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आत्त्मसंयमाचा अभाव, जिज्ञासेचा अभाव असे आजार दिसुन येतात.

Previous articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती. 👉भावी उमेदवारच्या आशा आकांक्षेवर फिरले पाणी……
Next articleशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून.. शेतकऱ्यांना सरसकट 75 हजार रुपये अनुदान देण्यात यावे – आ. माधवराव पाटील जळगावकर