Home Breaking News खडकी ( बा) तांडा येथे पोळा सण नाईक अनिल पवार कारभारी साहेबराव...

खडकी ( बा) तांडा येथे पोळा सण नाईक अनिल पवार कारभारी साहेबराव जाधव मोट्या उत्साहात साजरा……..

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी
रवीकुमार पवार खडकीकर.-७३५०३३३४१५

हिमायतनगर
तालुक्यातील खडकी बाजार तांडा येथे बैल पोळा सण शांततेत व कायद्यांचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला.
खडकी बाजार येथे श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात गावातील सर्व शेतकरी बंधूनी आपापले सर्जा राजांना घेऊन ठीक पाच वाजता हजर झाले होते.
सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना घेऊन श्री हनुमान मंदिराच्या अवतीभवती फेऱ्या शांततेत घालून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.
खडकी बाजार येथील ढोल-ताशांच्या आवाजात सर्जा राजांचा विवाह सोहळा शांततेत पार पडला आहे.


तसेच खडकी तांडा येथील श्री हनुमंत रायाच्या मंदिराजवळ तांड्यातील सर्व शेतकरी बंधूनी हा बैल पोळा सण थाटात साजरा केला आहे.
यावेळी तांड्यातील सर्व नागरिक महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleहोळकर पुलावर चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग
Next articleपावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात…..