Home Breaking News मातोश्री दगडूबाई प्रतिष्ठानच्या वतीने गंगाखेड मतदारसंघ क्षेत्रात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

मातोश्री दगडूबाई प्रतिष्ठानच्या वतीने गंगाखेड मतदारसंघ क्षेत्रात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकप्रिय आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांच्या ” मातोश्री दगडूबाई प्रतिष्ठानच्या “वतीने गंगाखेड मतदारसंघातील पूर्णा, पालम, गंगाखेड तालूक्यातील संपूर्ण क्षेत्रात “घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी उत्कृष्ट सजावट करणा-या विजेत्या गृहणींना प्रथम पारितोषिक म्हणून ११ हजार रुपयाची पैठणी साडी आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक म्हणून ७००० हजार रुपयाची पैठणी साडी आणि सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक म्हणून ५००० हजार रुपयाची पैठणी साडी आणि सन्मानचिन्ह, चतूर्थ, पंचम पारितोषिक म्हणून प्रत्येकी २००० हजार रुपयाची पैठणी साडी आणि सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.त्यासाठी सजावटीचा १ मिनीटाचा व्हिडिओ शुट करुन व्हिजीओल ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाठवायचा आहे.या स्पर्धेत अधिकाधिक भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान आणि आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ गंगाखेड पदाधिका-याच्या वतीने करण्यात आली आहे.
—————–
जेष्ठा गौरी (महालक्ष्मी) सणाला पारंपरिक महत्त्व आहे. ” गौराई माझी लाडाची गं, म्हणत प्रत्येक कुटूंबात गौरीपूजन फारच आकर्षक पद्धतीने केले जाते.त्यासाठी युवती आणि महिला विशेष परिश्रम घेत असतात. दिव्यांची आरस,फुलांची तोरणे अशा विविध पध्दतीने सजावट केली जाते.त्यामुळे चांगल्या उत्कृष्ट सजावटीचं चार चौघात सर्वत्र कौतुक व्हावं आणि सजावट करणा-या महिला भगिनींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. याकरिता नियम व अटी अशा आहेत, हि स्पर्धा गंगाखेड मतदारसंघातील युवती आणि महिलासाठीच मर्यादित असेल.स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेत एका कुटूंबातील एकाच युवती किंवा महिलेस सहभाग घेता येईल. स्पर्धेसाठी स्पर्धकांची वयोमर्यादा किमान १५ ते त्यावरील कितीही असले तरी चालेल. स्पर्धेच्या परिक्षणात ईको फ्रेंडली सजावटीस प्राधान्य देण्यात येईल. व्हिडिओ पाठवताना मुळ चित्रीकरण केलेले असावे. व्हिडिओ सोबत आपले संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता शुध्दा दिलेल्या व्हाटशाप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पेशल ईफेक्ट किंवा मिक्सींग करु नये. स्पर्धकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल. स्पर्धेत ऐनवेळी थोडा फार बदल करण्याचा अधिकार संयोजकाने राखून ठेवला आहे. स्फर्धेचा भव्य असा वितरण सोहळा मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपन्न होईल.
स्पर्धेमध्य असे व्हाल सहभागी’
—-
स्पर्धकांनी आपल्या घरी सजावट केल्या नंतर त्या त्या तालुक्यासाठी दिलेल्या व्हाटशाप क्रमांकावर सजावटीचा जास्तीत जास्त १ मिनीटाचा व्हिडिओ शुट करुन पाठवायचा आहे.
सजावटीचा व्हिडिओ खालील क्रमांकावर पाठवावा.
गंगाखेड तालूका 8208480846, पालम तालूका
9881867009,
पूर्णा तालुका
9881772495
तसेच अधिक माहितीसाठी प्रभाकर सातपुते यांच्याकडे 9921237585.

Previous article🌹” मित्र “🌹
Next articleआमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने बोरगडी तांडा२ येथे मिळाला तात्काळ गावठाण डीपी..