Home Breaking News हिमायतनगर रेल्वेस्थानकांची दुरावस्था. प्रवासांचे हाल!

हिमायतनगर रेल्वेस्थानकांची दुरावस्था. प्रवासांचे हाल!

भर पाऊसात टिनपत्रे गळतात.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक-19 सप्टेंबर 2022

हिमायतनगर रेल्वेस्थानकावर विदर्भ, तेलंगणा आणि मराठवाडा या तिन्ही प्रादेशिक विभागाचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक आहे. पण ईतर सोईसुविधा सोडुन द्या. प्रवाशांना भरपावसात आसरा मिळण्यासाठी ज्या टिनपत्राच्या शेडखाली थांबावे लागते. तेही गळते आहे. ना… शौचालय ना…मुत्रीघर या अवस्थेत हिमायतनगर रेल्वेस्थानकांची अवस्था आहे
पावसाळ्यात प्रवासांना थांबण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वेळेवर टिकीट भेटत नाही. स्वच्छ पाणी पिण्यासाठी प्रवाशांना पाण्याची व्यवस्था करावी. अशी अनेक प्रवाशांच्या तक्रारी आहेत. वरील सर्व सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशी मागणी हिमायतनगर तालुक्यातील अनेक प्रवाशांनी केली आहे.

Previous article*राज्यात सचिवांना दिलेले अधिकार मंत्रीना बहाल*
Next articleवाशी तांडा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकास दिले निवेदन……!