Home Breaking News *राज्यात सचिवांना दिलेले अधिकार मंत्रीना बहाल*

*राज्यात सचिवांना दिलेले अधिकार मंत्रीना बहाल*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे मंत्रालयातील काही विभागांतील कामांना खीळ बसू नये, म्हणून सरकारने मंत्रालयातील काही विभागांतील सचिवांना निर्णय घेण्याचे विशेष अधिकार दिले होते. शिंदे सरकारचा हा निर्णय चर्चेत आला होता.
आता हे अधिकार पुन्हा एक दा सरकारने मंत्री यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे रखडलेली कामे आता गतीने होतील, अशी आशा आहे. सचिवांना मंत्रीयांचे अधिकार दिल्यामुळे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचे सचिवालयात रूपांतर होईल, अशी टीका सरकारवर होत होती. मंत्रीमंडळात आता 20 मंत्री आहेत. तसेच 30 पैकी एकही खाते आता विनामंत्री नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

Previous article*हिंदी माध्यमिक/प्राथमिक विद्यालयात हिंदी साहित्य निर्मिती प्रदर्शन
Next articleहिमायतनगर रेल्वेस्थानकांची दुरावस्था. प्रवासांचे हाल!