Home Breaking News संभापूर येथे जि.प.शाळेत माहिती अधिकार दिन साजरा..!

संभापूर येथे जि.प.शाळेत माहिती अधिकार दिन साजरा..!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

संभापूर:- येथील जि.प.शाळेत २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक गोपनारायन सर, आणि भुमिराजा न्यूज चे प्रतिनिधी अजयसिंह राजपूत यांनी माहिती अधिकाराची सविस्तर माहिती सांगितली. नागरिकाला सरकार दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा अधिकार मिळालेला आहे व त्याचे महत्त्व सकलजणांना पटावे म्हणून या सोहळ्याचे प्रयोजन असते. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, आपण कररूपाने भरत असलेल्या निधीचा सुयोग्य वापर करतात ना, हे समजून घेण्याचा या अधिकारामागचा हेतू असतो.
या दिवशी निमसरकारी संघटना आणि प्रत्येक नागरिक वैयक्तिकरित्या काही कार्यक्रम आखून, लोकजागृती करू शकतात. आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारण करणे, हे सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य ठरते.अशा प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराबद्दल माहिती देण्यात आली.यावेळी गोपनारायन सर, कराळे सर, सोळंके मॅडम,तेलगोटे मॅडम, अजयसिंह राजपूत, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleसंभापूर येथील जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप.
Next articleसरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी परमेश्वर गोपतवाड यांची निवड-