Home Breaking News सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी परमेश्वर गोपतवाड यांची निवड-

सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी परमेश्वर गोपतवाड यांची निवड-

👉 आ. जवळगाकरांकडून अध्यक्षासह, नवनिर्वाचित संघटनेचे अभिनंदन

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 29 सप्टेंबर 2022

हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेची बैठक पंचायत समिती कै. वसंतराव नाईक सभागृहात 28 सप्टेंबर रोजी झाली. या बैठकीत सरपंच संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली असुन, अध्यक्षपदी बहुमताने सवना ज. चे सरपंच/चेअरमन परमेश्वर गोपतवाड यांची निवड झाली आहे.
सरपंच संघटनेच्या बैठकीची रुपरेषा प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी मांडली. तालुका कार्यकारिणीच्या निवडीबद्दल गणेशराव शिंदे, सरपंच सुधाकर पाटील, विशाल राठोड, कानबा पोपलवार, अशोक पाटील, संजय माझळकर, बाला पाटील, आदींनी विचार व्यक्त केले.
सरपंच संघटना अध्यक्षपदासाठी सवना ज. चे सरपंच परमेश्वर गोपतवाड, कारला पिचोंडी चे सरपंच गजानन पाटील कदम, टाकराळा येथील सरपंच बाला पाटील, हे तिन सरपंच इच्छुक होते. पक्षीनिरीक्षकासह व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनी तिघांचे एकमत करण्याची जबाबदारी घेतली होती.
कारला येथील सरपंच गजानन पाटील कदम यांनी माघार घेतली. गोपतवाड आणि बाला पाटील यांच्यात लढत झाली गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात गोपतवाड यांना 23 मते तर बाला शिंदे यांना 20 मते पडली. असल्यामुळे 3 मतांनी गोपतवाड विजयी झाल्याचे पक्षीनिरीक्षकांनी जाहीर केले. अध्यक्ष निवडीत एकमत झाले नसल्यामुळे, गुप्त पध्दतीने मतदानाची प्रक्रिया घ्यावी लागली. अध्यक्ष निवडीनंतर इतर कार्यकारीणीची बिनविरोध निवड करून, उपाध्यक्षपदी बाला पाटील टाकराळेकर, सचिव विशाल राठोड, कोषाध्यक्ष सौ. वंदनाताई कानबा पोपलवार, सदस्य सुधाकर पाटील सोनारीकर, सौ. स्वातीताई साईनाथ शिंदे, गौतम दवणे, सौ. अनुसयाबाई भिमरवाड, सौ. काशीबाई ठाकूर, सौ. दिव्याताई जैस्वाल, मारोती वाडेकर, सल्लागार सौ. यशोदाबाई प्रल्हाद पाटील, सौ. प्रभावतीताई गणेशराव शिंदे, संजय माझळकर, आदिंची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच संघटनेच्या अध्यक्षासह कार्यकारिणीचा सत्कार सरपंच बांधवांनी केला.

गोपतवाडसह संघटनेच्या कार्यकारिणीचे अभिनंदन – आ. माधवराव पाटील जवळगावकर

सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या व सरपंच पदाचा दिर्घ काळ अनुभव असणाऱ्या व्यक्तीमत्वास सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची संधी सवना ज.चे विद्यमान सरपंच परमेश्वर गोपतवाड यांना मिळाली. त्यांचे मनापासून अभिनंदन येणाऱ्या काळात तालुक्यातील सरपंच बांधवाच्या समस्या गोपतवाड शासन दरबारी मांडून न्याय देतीलच, त्याबरोबरच मी देखील सरपंच बांधवाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी परमेश्वर गोपतवाड यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून अभिनंदन व नवीन कार्यकारीणीचे कौतुक केले.

👉 सरपंच बांधवांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही – गोपतवाड
सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर परमेश्वर गोपतवाड म्हणाले की, सरपंच बांधवांनी विश्वास व्यक्त करून निवड केली आहे. तालूक्यातील सरपंच बांधवांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. सरपंच संघटनेसह सर्व सरपंच बांधवांना विश्वासात घेऊन, आपल्या समस्या तडीस नेण्यासाठी सदैव आपल्या सेवेत तत्परतेने काम करणार असल्याचे गोपतवाड यांनी सांगितले.

Previous articleसंभापूर येथे जि.प.शाळेत माहिती अधिकार दिन साजरा..!
Next articleरस्त्याच्या कामासाठी माहेर वासीयांचे जलकुंभावर बसून हल्लाबोल आंदोलन!