Home Breaking News कच्चे पांदण रस्ते, पक्के बनवा! 👉 शेतकऱ्यांची मागणी

कच्चे पांदण रस्ते, पक्के बनवा! 👉 शेतकऱ्यांची मागणी

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 06 नोव्हेंबर 2022

चांगली शेती करण्यासाठी शेतीला रस्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता म्हणुन, सवना ज. ते चिंचोरडी हा पांदण रस्ता प्रामुख्याने ओळखला जातो. या पांदण रस्ता शेजारी तेलंगणा राज्यात जाण्यासाठी अगदी सर्वात जवळचा मार्ग आहे. हा पांदन रस्ता शेतकऱ्यांनी स्वतः लोकसहभागातून माती काम करून जवळपास तिन वर्षांचा कालावधी लोटला आहे. अजुन तरी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी तुम्हाला पक्का रस्ता करुन देऊ. असे आश्वासन दिले नाही. आज गावातील बेरोजगार तरुण वर्ग मोठ्या आशेने आपली वडीलोपार्जीत शेती करतो आहे. पण पक्क्या रस्त्या अभावी शेती करणे दिवसेंदिवस अवघडच होतं आहे. नाईलाजाने पुणे, मुंबई येथे कंपनीत काम करण्याची वेळ युवा वर्गाला आली आहे.
हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांनी तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता पक्का बनवुन द्यावा. अशी मागणी सवना, रमणावाडी, चिंचोरडी, एकघरी, वाशी आदी गावातील लोकांनी केली आहे.

Previous articleरब्बी हंगामातील पेरणीस आला वेग…
Next article*शितल शेगोकार यांची आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती विभाग सचिव पदी निवड*