👉 रोखठोक वास्तव
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 14 डिसेंबर 2022
महाराष्ट्र राज्य सरकारने त्रीस्तरीय यंत्रणा लावली, असली तरी जिल्हा परिषद- पंचायत समिती आणि ग्रामीण भागातील गावातील लोकांचा विकास व्हावा. म्हणुन ग्रामस्तरावर ग्रामपंचायत कार्यालयची उभारणी केली. परंतु ग्रामीण भागातील बड्या पुढा-यांचा हस्तक्षेप असल्याने, तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत मोठ्या पुढया-याच्यांच हातात असल्याने, गावचे ग्रामसेवक सदरील गावात. दोन ते तिन महिन्यात एकदाच आपलाच शुभ चेहरा दाखवतात. हे वास्तव चित्र आहे. यावरुन कळले या ग्रामसेवकांना गावच्या संरपंच महाशयाचे अभय आहे. कारण एका ग्रामपंचायत सदस्य यांनी दिवसांपासून 12 काॅल केले. तरी हा माजुर ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांचा फोन उचलत नाही. त्यांचे खोटे असे ठरवुन, दुस-या ग्रामपंचायत सदस्यांनी तिनवेळा फोन लावला. चौथ्यांदा या महाशयांनी फोन उचलुन मी दुसऱ्या गावाला आहे. तिथे मिंटीग चालु आहे, असे म्हटले. यांना किती गावचा चार्ज आहे. हा कुठे कुठे नोकरी करतो. कुठुन येतो, अजुन तरी सदरील ग्रामपंचायत सदस्यांना हा यक्ष प्रश्न पडला आहे.
या ग्रामसेवकांला आपला संरपंच तालुक्यावर मोठे पद भुषवित आहे. असे वाटत असेल तर नवल वाटायला नको. पण….
👉 “मला कुणाची का? भिती वाटावी” असा ससेमिरा मिरविणाऱ्या ग्रामसेवकांला सदरील गावचे ग्रामपंचायत सदस्य धडा शिकविण्यासाठी समर्थ आहेत. हे विसरु नये…अशी चर्चा ग्रामपंचायत सदस्यांत चालु होती.