हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070
मराठी भाषा गैारव दिन व कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासुन सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात विविध शाळातील विद्यार्थी सहभागी झाले. त्यांनी हातात मराठी भाषेचा आदर व या भाषेच्या जनजागृतीसाठी घोषवाक्य असलेले फलक हातात घेतले होते.
नाशिक जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा आयुक्त यांच्या हस्ते पुस्तके तसेच कवी कुसुमाग्रज यांची प्रतिमा असलेल्या दिंडीचे पूजन करण्यात आले. मान्यवर अतिथिनी पालखी खाद्यावर घेतली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मराठी प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले.’ समृद्ध भाषा, मराठी भाषा, मायमाउली मराठी असा प्रचार यावेळी करण्यात आला. मुख्य मार्गावरून पालखी मिरवणूक काढ़ण्यात आली.