Home Breaking News जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी बेमुदत संप!

जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी बेमुदत संप!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 14 मार्च 2023

सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली एनपीस योजना रद्द करून सर्वांना 1982 ची जुनी पेंशन योजना लागु करण्याच्या प्रमुख मागणीसह, राज्य शासकीय ईतर प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासुन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
तेव्हा महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शाखा हिमायतनगर येथील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला आपल्या संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे.
तालुक्यातील तहसिल, पंचायत समिती, कृषि, आरोग्य, शिक्षक, भुमी अभिलेख आदी विभागातील कर्मचारी या सपात सहभागी असल्याने कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. या संपामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम दिसून आला आहे.
हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे सर्व कर्मचारी संघटनेने नायब तहसीलदार राठोड साहेब यांना निवेदन दिले आहे.

Previous articleआजच्या संपात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-र्यानी सहभागी व्हावे : अध्यापकभारती चे आवाहन
Next articleराज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या खारपाण पट्ट्यातील पाणी पुरवठा योजनेला स्थगिती विरोधात उपोषण