Home Breaking News महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री थेट बाळापुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर.

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री थेट बाळापुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर.

पारस येथे घटनास्थळी भेट

निलेश हिवराळे कार्यकारी संपादक

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी आज ग्राम बेलुरा खुर्द येथे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला आणि तातडीने शासकीय यंत्रणे ला सर्वेक्षण करण्याच्या आदेश दिले. यावेळी शेतकरी मनोहर डांगे यांनी कृषिमंत्र्यांना कांदा बीजोत्पादन आणि लिंबू पिकाचा विमा योजनेमध्ये समावेश करण्याचे निवेदन पातुर तालुक्याच्या वतीने दिले. यावेळी शशिकांत डांगे सुभाष प्रल्हाद डांगे पुंडलिक प्रल्हाद डांगे अविनाश केशवराव देशमुख यांनी नुकसानाची तीव्रता माननीय कृषिमंत्री यांना अवगत केली. यावेळी सरपंच राजेश रामचंद्र भाकरे, सरपंच धम्मपाल रामचंद्र इंगळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते

वाडेगाव येथील नुकसान ग्रस्त भागाचु पहानी करण्यासाठी वाडेगांव परिसरात तसेच बाळापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पहानी केली अस्ता त्यांनी सांगितले की खरोखरच नुकसान झाले असून सर्व नूकसान झालेल्या शेतकर्याना न्याय मिळेल यावेळी विठ्ठल सरऱ्य. नितीन मानकर . संदीप पाटील. दादा राव मानकर . गणेश कंडारकर. प्रशांत मानकर. सुनील मानकर . सुनील घाटोल. सागर सरप. विजयकुमार चिंचोळकर. अनिल बारबुदे. जयंद्र कातखेडे. प्रकाश मसने. मंडळ अधिकारी. तलाठी. कोतवाल कृषी अधीकारी. ईत्यादी कर्मचारी. शेतकरी. पत्रकार मंडळी पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleपारस येथील बाबुजी संस्थानमधे जिवित हाणीसह करोडो रूपयांच्या मालमत्येचे नुकसान
Next article*🌸जगणं कोणासाठी🍀*