Home Breaking News कल्याणकारी मजुर असोसिएशनच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कल्याणकारी मजुर असोसिएशनच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

शेख चाँद  जिल्हा प्रतिनिधी

गौरक्षण रोड अकोला येथील कल्याणकारी मजुर असोसिएशनच्या कार्यालयात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणकारी मजुर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाबुलालजी डोंगरे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक कामगार आयुक्त डॉ राजु दे गुल्हाने हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नवलकार कोचिंग क्लासेस संचालक प्रा.बलदेव नवलकार, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल युनियनचे अध्यक्ष संदेश गोपनारायण, मधुकर गोपनारायण, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे सदस्य मधुकर गोपनारायण हे होते यावेळी डॉ राजु दे गुल्हाने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले तर प्रा,बलदेव नवलकार यांनी बाबासाहेबामुळे आम्ही शिक्षित होऊन आज विद्यार्थी घडवीत आहोत बाबासाहेब म्हणत होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे उदगार काढले यावेळी कार्यक्रमाला गोपाल वानखडे, शिलवंत वानखडे, सुभाष इंगळे, भुषन हिवराळे, संजय वाकोडे, ज्ञानेश इंगळे, हिम्मत मोहोड, सुभाष वाहुरवाघ, संतोष भगत कल्याणकारी मजुर असोसिएशनचे प्रसिध्दी प्रमुख संतोष काळे, तसेच नवलकार कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थी विद्यार्थिनीची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित चोपडे तर उमेश इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous articleडॉ. मनोरमा व प्रा. ह. शं. पुंडकर महाविद्यालय, बाळापूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
Next articleबीडच्या मराठवाडा विभागीय “व्हाईस ऑफ मिडीया” अधिवेशनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : संदीप काळे