Home Breaking News सततच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

सततच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 30 एप्रिल 2023

निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जणु मुळावरच घाव घालतांना दिसुन येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत आकाशात काळे कुट्ट ढग जमा होऊन सकाळ, संध्याकाळ पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी प्लास्टिकची ताडपत्री हळदीवर पांघरूण – काढून मेटाकुटीला आला आहे. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून जमिनीतील तणांचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट केली आहे. परंतु पाऊस पडत असताना शेतकऱ्यांचे मशागतीचे पैसे वाया गेले जाणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
एकीकडे लग्नसमारंभची धामधुम सुरू असतांना या वरून राजाने वधुवरांच्या आईवडिलांची फजिती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Previous articleहिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीवर काॅग्रेसची एकहाती सत्ता!
Next articleभारतीय जनता पार्टी, जुने नाशिक मंडळ च्या वतीने गोदामाई प्रतिष्ठाणच्या स्वयंसेवकांचा 50 व्या सप्ताहा निमित्त सत्कार सोहळा उत्साहात संपन्न