Home राजकारण हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीवर काॅग्रेसची एकहाती सत्ता!

हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीवर काॅग्रेसची एकहाती सत्ता!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 29 एप्रिल 2023

जिल्ह्यातील सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना, हिमायतनगर येथील काॅग्रेस, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)युती राष्ट्रवादी आणि भाजप युती शिवसेना ( बाळासाहेबांची) असे मिळुन तीन पॅनेलचे एकुण ५८ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. परंतु हिमायतनगर- हदगाव विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी चांगले नियोजन करून अनुभवी, सक्षम उमेदवार निवडणूकच्या रिंगणात उभे केले. प्रत्येक मतदारांना आकर्षित करुन धुमधडाक्यात प्रचार केला. त्यामुळे विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही. एकुण १८ जागेवर काॅग्रेसचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवारांची ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.

Previous articleदाेन बाजार समित्यांसाठी मतदान सुरू
Next articleसततच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!