विनय सहस्रबुदधे कार्याध्यक्ष – राज्य सांस्कृतिक धोरण समिती व माजी खासदार यांनी घेतली दखल
हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
धनगर समाजाच्या प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेल्या व त्या ठेव्या द्वारे सांस्कृतिक,धार्मिक,व एतिहासिक मूल्यांची प्रतिक असलेल्या धनगरी ओवी व गजी नृत्य सारख्या कलांचे जतन व संवर्धन नवीन सां स्कृतिक धोरणात करावे, अशी शिफारस हेमंत शिंदे अध्यक्ष – महाराष्ट्र भटके विमुक्त जाती जमाती महासंघ यांनी राज्य सांस्कृतिक समितीचे कार्याध्यक्ष व माजी खासदार विनय सहस्यबुदधे यांच्या कडे केली, व त्याची द खल घेवून त्यांनी समितीतील सदस्यां द्वारे धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यांवर जावून या कलेच्या सादरी करण्यात पारंगत असलेल्या व लुप्त होत असलेल्या पथकांचा शोध घेवून धनगर समाजाच्या प्राचीन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
नाशिक येथील रॉयल हेरिटेज हॉटेल मध्ये राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा फेर आढावा घेण्यासाठी नागरिक, साहित्यिक, कलाकार
यांच्या कडून शिफारस, सुचना पाठविन्याचे आवाहन राज्य संस्कृतिक समितीच्या पत्रकार परिषद व बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात करण्यात आले होते.
हेमंत शिंदे यांनी या आधीही ” भटक्या विमुक्तांचे अंतरग ” या विशेषांकांचे संपादन व प्रकाशन करुन भटक्या विमुक्त जाती जमाती च्या साहित्य, संस्कृतीची ओळख समाजाला करुन दिलेली आहे.