Home Breaking News तालुक्याला अभ्यासु कृषिपर्यवेक्षक मिळाला हे आमच्या शेतक-याचे भाग्य.

तालुक्याला अभ्यासु कृषिपर्यवेक्षक मिळाला हे आमच्या शेतक-याचे भाग्य.

👉 परमेश्वर गोपतवाड सरपंच यांचे प्रतिपादन.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 08 जुन 2023

खरीप हंगाम पुर्व तयारी सभा आयोजित समारंभात ” शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषि विभागा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना, सवना ज. नगरीचे सरपंच, चेअरमन, कृ.उ. बा. विद्यमान संचालक यांनी हिमायतनगर येथील कार्यालयात कृषि सहाय्यक पदावर कार्यरत असलेले, आपल्या बुद्धी कौशल्याने महाराष्ट्र शासनाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नुकतेच जवळगाव मंडळ येथे कृषि पर्यवेक्षक या पदाचा पदभार घेऊन, प्रथमच सवना ज. नगरीतील निलेश वानखेडे यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा संपन्न झाली. सवना ज. नगरीचे सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी निलेशजी वानखेडे साहेबांना भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या. विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वानखेडे साहेब यांचासारखा तालुक्याला विशेषतः आमदार साहेबांच्या कृषि महसुल मंडळात अभ्यासु, शांत आणि संयमी कृषि पर्यवेक्षक मिळाला हे आमच्या शेतक-याचे भाग्य आहे. अशा शब्दांत सरपंच परमेश्वर गोपतवाड साहेबांनी तोंडभरून स्तुती केली आहे.

Previous articleदलित पँथरच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मिळाला न्याय..
Next articleमराठेशाहीच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे होळकरशाही- व्याख्याते लक्ष्मण नजान