Home Breaking News पाचोरा येथील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या लोकप्रतिधी निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन

पाचोरा येथील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या लोकप्रतिधी निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन

शेगांव प्रतिनिधी;-जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील संदीप महाजन या पत्रकारास आमदार
पाटील यांनी शिवीगाळ करून गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून मारहान केली.यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली संग्रामपूर तालुका अध्यक्ष शे. कदीर शेख दस्तगिर व संग्रामपूर तालुका पत्रकार यांच्या वतीने तमगाव पोलिस स्टेशन व तहसील कार्यालय संग्रामपूर यांना एकत्रितरीत्या निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनात नमूद महाराष्ट्र विधान- मंडळाचे अधीनियम नुसार मा. राज्यपाल पत्रकारांच्या सुरक्षेकरिता केलेल्या विनियम व प्रसार माध्यमातील पत्रकारावर होणाच्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी २०१९ च्या अधिनियम 23 प्रमाणे मा. राष्ट्रपती यांच्या संमतीने दि. ८ नोव्हे. २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये पत्रकार सुरक्षा कायदा तयार झाला असताना लोकशाहीच्या आधरस्तभावर अन्याय होत आहे पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी झटतो अश्या वेळी एका पत्रकारावर लोकप्रतिनिधीकडून हल्ला होणे हि अत्यंत निंदणीय बाब आहे. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधीवर कठोर कार्यवाही व्हावी, याकरिता राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली. “संग्रामपुर तालुका कडून निवेदन देण्यात आले आहे
यावेळी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघचे विदर्भ उपाध्यक्ष रवी भाऊ शेगोकार तालुका अध्यक्ष शे. कदिर, ,उदेभान दांडगे,विवेक राऊत,ज्ञानेश्वर दांदले,नदीम खान, महादेव अजने,नंदुभाऊ पाटील हे उपस्थित होते .

Previous articleपत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा हिमायतनगर येथील पत्रकारांचे शासनाला निवेदन…..
Next articleपहिल्याच दिवशी ९०० विद्यार्थ्यांची फ्रि डेंटल चेकअप कॅम्प; अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम