Home Breaking News शेलगाव उजाड हनुमान मंदिर येथे भक्त मंडळीच्या वतीने भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना...

शेलगाव उजाड हनुमान मंदिर येथे भक्त मंडळीच्या वतीने भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना व नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा.

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगांव :- शेलगाव उजाड येथील हनुमान मंदिर भक्त मंडळांच्या वतीने शेलगाव उजाड हनुमान मंदिर परिसरा मध्ये दिनांक २१ऑगस्ट २०२३ वार सोमवार रोजी सकाळी ठीक १० वाजता नागपंचमी व श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पावन मुहूर्ताचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना केली तसेच याच ठिकाणी नागपंचमी निमित्त पूजा अर्चा करुण पारंपरिक पद्धतीने माता भगिनींनी झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोके खेळून नागपंचमी व श्रावण सोमवार हा सन मोठ्या आनंदाने साजरा केला. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की शेलगाव उजाड ग्रामपंचायत हद्दीतील प्राचीन व प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराचा बराच मोठे भक्त मंडळ आहे या भक्त मंडळांच्या वतीने या हनुमान मंदिराची व मंदीर परिसराची उत्कृष्ट देखभाल केली जात आहे या भक्त मंडळाच्या वतीने या हनुमान मंदिर परिसरातील जुन्या भगवान शंकराच्या पिंडीच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला नव्याने बांधण्यात आलेल्या या मंदिरात श्रावण महिन्याचा पहिला सोमवार व नागपंचमी अशा दुग्ध शर्करा योगाच्या पावित्र पावन मुहूर्तावर नवीन भगवान शंकराच्या पिंडीची व नंदी भगवानाची स्थापना ब्रह्मवृंदांच्या मुख वाणीतून मंत्रोपचार करुण व मुख्य पाच वेवाहिक जोडप्यांच्या हस्ते पुजन करुण करण्यात आली तसेच या स्थापने प्रसंगी अनेक भक्त मंडळींच्या जोडप्यांच्या म्हणजेच पती पत्नी यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांच्या मुख मंत्रोपचारात होमहवन पुजा करण्यात आली यानंतर मोठ्या प्रमाणात पूजा व आरती झाल्या नंतर प्राचीन व पारंपारिक पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करण्या करीता मोठ्या कडुनिंबाच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर माता भगिनींनी झोके खेळून हा नागपंचमी सन मोठ्या उत्साहात साजरा केला. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात माता भगिनींनची व नागरिकांची उपस्थिती होती तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेलगाव उजाड हनुमान मंदिर भक्त मंडळाच्या सर्व भक्तांनी प्रामाणिक प्रयत्न केले.

Previous articleअखेर जलंब येथे मुंबई हावळा मेल व सुरत अमरावती एक्सप्रेसला थांबा मंजुर.
Next articleसुजात आंबेडकर ह्यांचा युवा आदिवासी संवाद दौरा संपन्न