Home Breaking News वाडेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर करण्यासाठी पंचायत समिती सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर...

वाडेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर करण्यासाठी पंचायत समिती सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला.

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट

वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यासाठी पंचायत समिती सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला याबाबतचे पत्र पंचायत समिती गटविकास अधिकारी व सभापती यांच्याकडून वाडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुगत डोंगरे यांनी 6 फेब्रुवारी प्राप्त झाले
वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रणीवर्धंन रुपांतर करण्यासाठी पंचायत समितीची मान्यता प्रदान करण्यासाठी सुगत डोंगरे रा वाडेगाव यांनी अर्ज सादर केला होता या अर्जाचे सभेत वाचन करण्यात आले.वाडेगाव हे जास्त लोकसंख्येचे व बाजारपेठेचे गाव असल्यामूळे येथे इतर गावचे लोक बाजारपेठेच्या दुप्टीने व रुग्णालय
सुविधेसाठी येतात.त्याना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याकरिता ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन मान्यता प्रदान केली होती यावर पंचायत समितीच्या सभेची मान्यता देण्याबाबत विनंती केली होती याकरिता पं.स.सदस्य सुचक अफसर खान इसा खान तर अनुमोदन रूपाली काळे यांनी दिली

Previous articleसमाजातील शेवटच्या घटकाला देखील उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे – राजश्री पाटील
Next articleहिमायतनगर तालुक्यात गारांचा पाऊस…..