Home Breaking News शितल शेगोकार ह्या फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित

शितल शेगोकार ह्या फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित

शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणाऱ्या शितल शेगोकार यांना साहित्य धारा बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी नगर या संस्थेद्वारे 2586 बुद्ध जयंती उत्सव 2024 चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघर्ष बळीराम सावळे उपाध्यक्ष श्रीमती रेखा कडू कांबळे तसेच माननीय  सुभाष शिंदे सचिव या संयोजन निवड समितीने फुले शाहू आंबेडकर हा पुरस्कार शितल शेगोकार शेगाव यांना गोविंद भाई श्रॉफ ललित कला अकादमी नाट्यगृह औरंगपुरा  सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे 5 मे 2024 रोजी जाहीर केला आहे शितलताई शेगोकार ह्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील रहिवासी असून त्या केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी आरएसएस रचनात्मक सेवा संस्था या संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे तसेच त्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण अमरावती विभाग सचिव आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला पाहून विदर्भातील लोकांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Previous articleतरूण व तडपदार देवराव भाऊराव हिवराळे यांची वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदि निवड.
Next articleबाबुराव कदम कोहळिकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यात चुरस.