Home Breaking News _इ ५ वी व ८ वी चा वर्ग प्राथमिक विभागाला जोडण्याच्या आदेशाला...

_इ ५ वी व ८ वी चा वर्ग प्राथमिक विभागाला जोडण्याच्या आदेशाला स्थगिती साठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आक्रमक

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांना निवेदन देण्यात आले .१५ मार्च २४ रोजीचा शासन आदेश स्वराज्य संस्थेतील अनुदानित शाळेच्या इ ५ वी ८ वी वर्ग प्राथमिक विभागाला जोडण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे .मुख्याध्यापक संघाचे सचीव -एस . बी . देशमुख यांनी CEO श्रीमती – आशिमा मित्तल यांनी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थाची परिस्थिती ,शाळेच्या पटावरील संख्या, अतिरिक्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न ई . भूमीका स्पष्ट करून सांगीतल्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे शाळा व आधिकार संपुष्टात आणण्याचे काम शासन करीत आहे शाळेसाठी विसंगत व अशैक्षणिक सुधारीत निकष विहित करणारा आदेश असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यावेळी श्रीमती आशिमा मित्तल यांनी सदर आदेशावर पुर्नविचार करण्यासाठी शासनाकडे आग्रह धरण्याचे आश्वासन दिले .त्यामुळे संस्था, शाळांना व शिक्षकांना दिलासा मिळणार आहे . मा शिक्षणाधिकारी – प्रविण पाटील यांनी ज्या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे तसेच १ कि.मी . पेक्षा कमी अंतर आहे त्यांना हा नियम लावु नये. आर . टी . ई च्या नियमा नुसार पालकांनी आपले प्रवेश निश्चीत करावे . प्राथमिक विभाग दाखले अडवणूक करणार नाही याची दखल घेतली जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिले .त्यामुळे माध्यमिक विभागाला दिलासा मिळणार आहे . जिल्हातील मुख्याध्यापकांनी याबाबत आपले प्रवेश सुरु करावे असे मुख्याध्यापक संघाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे . यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष – एस के सावंत, सचिव – एस . बी . देशमुख, उपाध्यक्ष , प्रदिप सांगळे, भागीनाथ घोटेकर , डॉ . अनिल माळी, नागरे बी . के . आर .आर .भामरे , पवार ए एस, घुगे पी जी , नरेद्र वाघ, एस आर देशमुख ,एम डी काळे व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .

Previous articleवन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती!
Next articleकॉंग्रेस ने नांगी टाकली.