Home Breaking News तहानलेल्या वन्य प्राण्यांची थेट गावाकडे धाव……

तहानलेल्या वन्य प्राण्यांची थेट गावाकडे धाव……

हिमायतनगर / प्रतिनिधी ( अंगद सुरोशे)

उन्हाचा पारा चांगलाच तापल्याने वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच फजिती होत आहे तापमान वाढल्याने वन्य प्राणी जिवांना पाणी मिळत नसल्याने वानर सेनेने थेट गावाकडेच डेरा थाटला असल्याचे दिसून येते हे वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे तसेच तांडे वाड्यात शिरत आसुन ते स्वताचा जिव वाचवण्यासाठी पाण्याचा शोध घेत आहेत पण गावात येताच या वन्य प्राण्यांची भिती निर्मान झाली आसल्याचे बोलल्या जात आहे पाणी पिऊन हे वानर सेना गावात हौदोस घालत आसुन याचा मोठ्या प्रमाणात महिलांसह बालकांना त्रास होत आहे वन्य प्राणी यांच्या संरक्षणाचा कायदा सक्षम असल्याने वन विभागाने या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामिण भागातुन होत आहे

Previous articleडेंगूच्या आजाराचा ताप आल्याने बोरगडी तांडा येथील एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू……
Next article*सुखी माणुस*