Home Breaking News औष्णिक विद्युत केंद्र, पारस येथे खालील मागण्यासाठी.द्वार सभा व निदर्शन, आंदोलन करण्यात...

औष्णिक विद्युत केंद्र, पारस येथे खालील मागण्यासाठी.द्वार सभा व निदर्शन, आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना, संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य द्वारें.

बाळापुर प्रतिनिधी:- दिनांक 26 -03 -2025 रोजी 

आंदोलनामध्ये स्वाभिमान महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना, संयुक्त कृती समितीचे संयोजक :-मा. मनोहर अवचार

सहसचिव:-मा. नितेश तायडे, सदस्य:-मा.रंजीत तायडे,मा.मुरस्सलिन खान,मा..कैलास धनोकार तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील समस्त कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

विज प्रशासनाने द्वारसभा व निदर्शने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित खालील मागण्या मान्य करण्यासाठी बैठकीला पाचारण करावे.

* ऊर्जा प्रशासनाने 14 ऑक्टोंबर 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये 19 टक्के मूळ वेतन वाढ देताना टाकलेल्या ज्याचक अटी काढण्यात याव्या.

* किमान वेतन वाढ सरसकट तात्काळ लागू करावी.

* पाच लाखाचा मेडिक्लेम (कॅशलेस) त्वरित लागू करावा.

* स्वातंत्र्य वीज उद्योग श्रेणी लवकरात लवकर घोषित करावी.

Previous articleचुकीच्या पद्धतीने होणाऱ्या इ चलान दंड बंद करा – वंचित बहुजन आघाडी
Next articleहरीभाऊ बोलसटवार यांचे वृद्धापकाळाने निधन