Home Breaking News रोही प्राण्याने केली शेतक-यांच्या कोथींबीर पिकांची नासाडी.

रोही प्राण्याने केली शेतक-यांच्या कोथींबीर पिकांची नासाडी.

👉 नुकसान भरपाई देण्याची मागणी

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 29 मार्च 2025

हिमायतनगर तालुक्यात जंगली प्राण्यांनी शेतक-याच्या पिकात अक्षर:क्षा हैदोस घातला आहे.
मौजे सवना ज. येथील अल्पभुधारक शेतकरी पार्डी शिवारात त्यांची जमीन असुन शेतकरी संजय दत्तराव राऊत गट क्रमांक ४६ यामध्ये ०.२० हे. क्षेत्रावर कोथींबिर या भाजीपाला पिकांची पेरणी आहे. परंतु रात्रीला रोही या प्राण्यांने अक्षर:शा कोथींबिर पिक खाऊन टाकले आहे. सदरील शेतक-यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबुन असुन, कोथींबिर पेरणीसाठी नांगरणी, वखरणी, पेरणी, बियाणे, खते, औषधी आदी बाबींचा खर्च वाया गेला आहे. असेही राऊत यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासन वनविभाग हिमायतनगर यांनी पंचनामा करुन त्वरीत आर्थीक मदत देण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Previous articleहरीभाऊ बोलसटवार यांचे वृद्धापकाळाने निधन
Next articleगुढीपाडव्यानिमित्त तास करुन सर्जा-राजाची मनोभावे मा. आमदार जवळगांवकरांनी केली पुजा-अर्चना.