मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 में 2025
महाराष्ट् राज्यसेवा अंतर्गत सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्यवित्त व लेखाधिकारी वर्ग एक वन पदी नुकतीच निवड झाल्याची बातमी कळताच हिमायतनगर शहरात फटाक्याची आतषबाजी करीत अनिकेतचे स्वागत करण्यात आले.
माजी जिल्हा परीषद सदस्य, कृ.उ.बा.समीतीचे मा. सभापती, श्री परमेशवर मंदिर ट्स्टचे विश्वस्त कै. लक्ष्मण शक्करगे साहेब यांचे नातु जगदंबा माध्यमीक विद्यालयाचे माहुर सहशिक्षक परमेश्वर शक्करगे सर यांचे चिरंजीव आहेत. तर पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, रामेश्वर शक्करगे यांचे पुतणे आहेत. तर सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी चवरे साहेब यांचे ते नातु आहेत.
जिद्द, चिकाटी, मेहनत आणी अभ्यासातील सतत सातत्य ठेवत हे यश त्यांने संपादित केले आहे. अनिकेत घ्या या यशाचे स्वागत सर्व स्तरातुन होत आहे. यशाचे श्रेय त्यांनी आईवडील, गुरूजी मित्र यांना त्यांनी दिले आहे.