Home Breaking News हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर…

हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 17 में 2025

नांदेड जिल्हयात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असुन, शहरातील नाल्या तुंडंब भरुन वाहत आहे. नालीतील केरकचरा, घाण रोडवर येऊन दुर्गंधी सुटते आहे.

गेल्या दोन दिवसांपासुन हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाने कहरच केला आहे. रात्री बेरात्री पाऊस पडत असुन, घरावरील पत्रे पावसाने गळत आहेत. उन्हाळयात जमिनी धुप होऊन, पावसाळ्यात पाऊस पडताच जमीन लागवडीयोग्य तयार होते. परंतु उन्हाळयातच अवकाळी पाऊस पडत असल्याने जमिन तापत नसुन पावसामुळे जमीनीतील ओलावा वाढत असुन बुरशीचे प्रमाण वाढण्यास हा पाऊस हानीकारक असल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत.

उन्हाळी ज्वारी पिकासाठी हा पाऊस नुकसानकारक आहे. तिळ पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. लग्नसराई धुमधडाक्यात सुरु असुन या पावसामुळे लग्नसंमारंभात विघ्न येत आहेत.

Previous articleपंचवटी नाशिक येथील तारवाला नगर मधील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन