हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
राज्य सरकार व केंद्रसरकार अनेकविधि कार्यक्रम घेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करत आहे. त्यांचेच सरकारचा पर्यटन विभाग घाट नांदूर मधमेश्वर येथील पुण्यश्लोक यांनी बांधलेला होळकरशाहीचा ऐतिहासिक वारसा असलेला होळकरवाडा बुलडोजर लावून पाडला.
दोन महिण्यापुर्वी फेब्रुवारी महिण्यात आरएसएसचे भैय्याजी जोशी आणि मंत्री छगन भुजबळ यांनी येथील राममंदिराच्या जिर्णोद्धाराच्या नावावर भुमिपुजन केले. तेथील होळकरवाडा आणि जमीन कमाविसगार याच्या घशात खोट्या कागदपत्रांच्या वापराने घालण्याचा डाव आहे.
त्यावेळी होळकरशाहीच्या अनुयायांनी काही प्रमाणात विरोध केलेने मंत्री यांनी अशी कोणतीही बाब केली जाणार नाही असे उत्तर दिले.
पण, दुर्दैवाने आज तो होळकरशाहीचा वाडा डोजर लावून जमिनदोस्त केला. राज्यातील धनगर जमातीच्या अस्मिता जमिनदोस्त केल्या.इतर कोणत्याही ऐतिहासिक वास्तूच्या एका वीटेला जरी हात लावला असता तर…..तो डोजर वाडा जमिनदोस्त करतानाचा व्हिडिओ पाहताना मन चर्च झाले. जणू काय कोण तरी तो डोजर आमच्या हृदयावरुन फिरत आहे.
सरकार हि अन्यायी कृती थांबविणार काय? ज्याने हि वर्कअाॅर्डर दिली त्याचेवर ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याच्या मुद्द्यावर अटक करुन तुरुंगात डांबणार काय?
चालविलेला जेसीबी जप्त करुन मालकावर कारवाई करणार काय? हे सारं कारस्थान रचणार्यास आणि जमिन हडपू पाहणार्यास शिक्षा करणार काय?
ऐतिहासिक वास्तू आहे हे माहित असूनही ती पाडण्याबाबत कागदपत्र देणार्यास निलंबित करुन त्याचेवर गुन्हा दाखल करणार काय?
आम्ही त्रिशताब्दी जयंती महोस्तवाच्या तयारीत असताना, सरकारी हि कृती अत्यंत खेदजनक आहे.सरकारने तात्काळ संबंधित सर्वांवर कारवाही करुन ह्या वाड्याचे जतन आणि संवर्धन करावे.
निवांत कोळेकर सांगली 8329665901 पेरियार प्रबोधनीराजकिय परिवर्तन परिषद



