जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 में 2025
👉 दुःखद घटना…
पोटाची खळगी भरण्यासाठी रोज मजुरी साठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला…
नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील वरवट येथील एक आज दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच संयुक्त कुटुंबातील मुलीचा मृतदेह चुलती आणि पुतणी शोध सुरू आहे….अचानक झालेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढयांला आलेल्या पुरात वाहून गेल्याचे विसासनीय वृत्त आहे….
……..हदगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या मौजे वरवट या गावातील दिनांक 27 मे मंगळवारी दुपारी 11.45 वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. तो पाऊस तब्बल दीड तास पडत होता. शेतात मजुरीला गेलेल्या महिलेसोबत तिच्या कुंटुबातील अन्न सदस्य देखील होते. सतत मुसळधार पडणारा पाऊस आता थांबेल थोड्यावेळाने थांबेल या आशेने घराकडे परत येत असताना, नाल्याला पुर आला त्या पुरात आपली चिमुकली वाहुन जात होती. तिला परत आणण्याचा प्रयत्न करताना आई , पुतणी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज रोजी घडली आहे.
मौजे वरवट येथील अरुणा बळवंत शकिरगे वय 25 वर्षे या आपल्या कुटुंबाची उपजीविका करणा-या आपली शेती पाहत दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत होत्या. अचानक पाऊस सुरू झाला मौजे वरवट गाव नजीक असलेल्या नाल्याला पूर आला. त्या मध्ये अरुणा बळवंत शकिरागे, दुर्गा बळवंत शकिरगे वय 9 वर्षे आणि अंकिता विजय शकिरगे वय 5वर्षे या पुरात वाहून गेल्या आहेत. वृत्त लिही पर्यंत दुर्गा हीचा मृतदेह सापडला आहे. अजून दोघींचा शोध सुरू आहे….