Home Breaking News नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर थेट पोहचले आमदार बाबुराव कोहळीकर..

नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर थेट पोहचले आमदार बाबुराव कोहळीकर..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 12 जुनं 2025

मंगळवारी रात्री झालेल्या वादळीवादळ्यामुळे शेती आणी घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये केळी उत्पादक शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे शेतक-यांच्या पिकाचे भयावह नुकसान न पाहता येणारे आहे. हि बाब लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर लक्षात घेऊन,

मंगळवारी रात्री झालेल्या वादळीवादळ्यामुळे शेती आणी घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये केळी उत्पादक शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे शेतक-यांच्या पिकाचे भयावह नुकसान न पाहता येणारे आहे. हि बाब लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर लक्षात घेऊन, कामानिमित्त मुबंईचा दौरा आटोपुन लगेच हदगांव- हिमायतनगर मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतक-यांच्या थेट बांधावर पोहचुन शेतक-यांच्या अडीअडचणी ऐकुन घेतल्या. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, कृषिमंत्री माणीकराव कोकाटे यांच्या माध्यमातुन सर्वोतपरी मदत मिळविण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी शेतक-यांना सांगितले आहे.

दोन दिवस मुंबई ला असल्यामुळे येता आले नाही. परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. याची माहिती मिळताच त्वरित उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले व शिंदे साहेबांनी तत्काळ जिल्हाधिकारी नांदेड यांना पंचनामे करून तत्काळ शेतकरी बांधवांना योग्य ती मदत मिळावी याकरिता उचित आदेश दिले. व आज सकाळी देवगिरी एक्सप्रेस ने आल्यावर कुठेही न जाता आज थेट अतिवृष्टीमुळे झालेल्या केळीच्या नुकसानाची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना रोडगी,चोरंबा आदी गावातील शेतक-यांच्या बांधावर आमदार कोहळीकरांनी भेटी दिल्यामुळे शेतक-यामध्ये समाधान व्यक्त करीत आहेत.

Previous articleके. व्ही. एन. नाईक चौक या गंगापुर नाका येथील वाहतुक बेट विकसित नामकरणाचा उदघाटनाचा कार्यक्रम मा. दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्या होणार
Next articleशोक सदेश