👉🏻बावीस वर्षाच्या निष्ठेला फळ मिळाले….
👉🏻 ओ.बी.सी. नेतृत्वाला संधी देऊन खासदार आष्टीकरांनी शब्द पाळला….
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 जुन 2025
तालुक्यातील मौजे बोरगडी येथील कडवट व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्या सह जिल्ह्याला परिचित असणारे व मागील अनेक वर्षापासून आष्टीकर घराण्याशी एकनिष्ठ असलेले स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारे करणारे कडवट शिवसैनिक ओबीसी नेते संजय काईतवाड यांची नुकतीच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सामना या वृत्तपत्रातून हिमायतनगर तालुका प्रमुख पदी निवड केल्याचे जाहीर केले. त्यामुळे 22 वर्षाच्या या निष्ठेला अखेर फळ मिळाल्याची भावना नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय काईतवाड यांनी व्यक्त केल्या…
उपजिल्हा संघटक पदी विठलभाऊ ठाकरे तर शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार यांची निवड
खासदार नागेश पाटील आष्टीकर व नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना वाढीसाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय काईतवाड यांनी बोलून दाखवले….✍🏻