दिनांक 05/08/2025 कल्याण वानखेडे
तालुका प्रतिनिधी..
हिमायतनगर तालुक्यातील सोयाबीन पिकांवर नवीन संकट
संततधार पाऊस व काही काळ उष्णता यामुळे सोयाबीनचे पीक संकटात आले आहे. ‘येलो मोझॅक व्हायरस’मुळे ऐन फुले आणि शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. हा रोग सोयाबीन पिकांवर पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येते येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या कीडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या व्हासरसने सोयाबीन पिकावरच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पिकांची फेरपालट न करणे तिन्ही हंगामात सोयाबीन घेणे तसेच वातावरणात निर्माण झालेल्या उष्ण आणि दमट वातावरणाने सोयाबीनवर हा व्हायरस आल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे निम अर्क फवारणी करावी.
पिवळ्या रंगाचे ट्रॅप लावावेत..
मका पिकाचे इरवा घेणे गरजेचे असते..
तसेच पांढऱ्या माशीचे रसशोषक किडीचा प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे..



