मारोती अक्लवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15/08/2025
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मौजे आदर्श गांव टेंभी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते गणपतराव पुजरवाड यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करून, हि निवड करण्यात आली आहे. यापुर्वी परमेश्वर दादा अक्कलवाड ( जय गुरु), संभाजी अक्कलवाड यांनीही गावातील तंटे मिटविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे..
गणपतराव आपल्या मनोगतात म्हणाले गावाला निःपक्षपाती पणे न्यास देण्यासाठी स्वताला झोकुन देऊन काम करू असेही ते म्हणाले..यावेळी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील नागरीक उपस्थीत होते..



