Home Breaking News महादेव मिरगे यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

महादेव मिरगे यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

संदिप देवचे ग्रामीण पत्रकार
9860426674
जलंब:जलंब येथील भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव मिरगे यांची बुलढाणा जिल्हा भाजपा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.पक्षा सोबत असनारे त्याचे प्रेम पक्षा चे असो किंवा धार्मिक या सामाजिक कार्यात ते सदा अग्रेसर असतात व त्याचें पक्षा सोबत कामकरण्याची तडप पाहुनच ही निवड जिल्हाध्यक्ष सचिन पंजाबराव देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. महादेव मिरगे हे आपल्या नियुक्तीचे श्रेय ना. अकाश फुंडकर व आमदार संजय कुटे यांना देतात. या आधी सुध्दा महादेव मिरगे यांनी अनेक पदावर काम केलेले आहे. भाजपा युवा मोर्चा शेगाव तालुका उपाध्यक्ष, भाजपा ग्राम शाखाध्यक्ष, तालुका भाजपा उपाध्यक्ष, सरचिटणीस, कार्यकारिणी सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शेगाव तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले

Previous articleराजकीय सामाजिक उत्तराधिकारीचं उत्तरदायित्व 
Next articleआत्महत्याची मालिका थांबता थांबेना अतिवृष्टीमुळे पार्डी येथील आणखी एका शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या