कार्यालयीन प्रतिनिधी/
पातूर तालुक्यातील ग्राम पार्डी येथील शेतकरी दादाराव नरिभान हिवराळे यांच्यावर असलेल्या कर्जाच्या व सततच्या नापिकीमुळे व यावर्षी झालेल्या ओल्या दुष्काळामुळे त्यांच्यावर शेतीवर असणारे बँकेचे कर्ज,गटाचे कर्ज,खाजगी सावकाराचे कर्ज या सर्व कर्जाच्या ओझ्यामुळे व यावर्षी झालेल्या अति -पावसामुळे शेतीचे नुकसान होऊन कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत अडकलेल्या कर्जबाजारीपणामुळे वय वर्षे 70 असलेल्या दादाराव नरीभान हिवराळे यांनी स्वतःच्या राहत्या घरात 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 च्या दरम्यान विष प्राशन केले व मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान 16 ऑक्टोबर रोजी शासकीय जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे ते मरण पावले असून एका आठवड्या पूर्वी एका शेतकरी आत्महत्या झाली असताना लगेच अजून पार्डी गावातील एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येने गावांतील नागरिकांत भयभीत वातावरण निर्माण झाले असून परिसरात हळहळ निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा,सून व विवाहित 3 मुली एवढा परिवार असून त्यांचे परिवाराचे भवितव्य अंधारात आले असून शेतीशिवाय उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पर्याय नसून प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन मदत द्यावी अशी मागणी होत आहे.



