
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा न्युज मो. नंबर – 8983319070
प्रतिनिधी( नाशिक )नाशिक येथे आत्ताच शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या सोहळ्यासाठी होळकर राजघराण्याचे वंशज तसेच विविध सरदार घराण्याचे वंशज यांनी हजेरी लावली होती परंतु या शिवजयंतीच्या थाटामाटात पार पडलेल्या सोहळ्यामध्ये परत एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे रामकुंडावरील इतिहासाची जागृती व्हावी. तसेच मनकर्णिका घाटासारखी परिस्थिती नाशिकमध्ये होऊ नये. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक चर्चेत आले या आधीही मागील पाच वर्षापासून हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक यांच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम जन्मोत्सव सोहळे पुण्यतिथी कार्यक्रम या सर्वांच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेले माजी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे मंत्री छगनराव भुजबळ सध्याचे जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन खासदार राजाभाऊ वाजे, पर्यटन विभाग मंत्री अशा एक ना अनेक मान्यवरांना या संदर्भात निवेदन देऊन पंचवटीतील रामकुंडावर अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक होण्याबाबत तसेच अहिल्यासृष्टी तयार करण्यासाठी विनंती केली
परंतु अद्यापही या स्मारकास मुहूर्त लागलेला नाही किंबहुना शासनाकडून याबद्दल अजूनही कुठले सुतोवाच केलेले नाही. आणि विशेष म्हणजे आत्ताच साजरा झालेल्या शिवजयंती जन्मोत्सव सोहळ्यामध्ये तळोदा संस्थान जाहगीरदार श्रीमंत अमरजीत दादा बारगळ यांनी परत एकदा पंचवटी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाविषयी आपल्या भाषणामध्ये विचार मांडले अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले धर्मरक्षणाचे, धर्म जागृतीचे व धर्मप्रसाराचे कार्य जगविख्यात असून या कार्याची दखल घेऊन सध्याच्या सरकारने पंचवटी येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक त्वरित सुरू करावे व या स्मारकासाठी योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली. अमरजीत दादा बारगळ हे मल्हारराव होळकर यांचे मामा भोजराज बारगळ या सरदार घराण्याचे वंशज असून आजही होळकर राज परिवारामध्ये बारगळ घराण्याचे महत्त्व कायम आहे त्याचबरोबर इतरही सरदार घराण्यातील वंशजांनी या गोष्टीस दुजोरा दिलेला असून गेली पाच वर्ष या ठिकाणी समाधान बागल यांनी या ठिकाणी इतिहास जागृतीसाठी, स्मारकासाठी जागृतीचे काम केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पंचवटी येथील रामकुंडावर स्मारक व्हावे ही नाशिककरांची खूप जुनी इच्छा असून याबद्दल शासन अजूनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे यंदाचे वर्ष हे कुंभपर्वाचे वर्ष असल्याने भरभरून येणारा निधी व या निधीतून होणारी विकास कामे यामध्ये हे स्मारक सामील करून कुंभमेळ्याच्या धरतीवरती हे करणे सहज शक्य असल्याचे जाणकारांच्या वतीने सांगण्यात येत आहे परंतु इच्छाशक्ती व योग्य हेतूपूर्वक शासनाकडून काम होण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे
आम्ही मागील अनेक वर्षांपासून पंचवटी येथील रामकुंडावर अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करत असून शासनातील कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री पालकमंत्री महापौर आमदार खासदार या सर्वांनाच ह्या गोष्टीसाठी आम्ही निवेदने,पत्रे व विनंती करून झालेली आहेत शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून लवकरात लवकर स्मारकाचे काम सुरू करावे अशी आम्ही शासनाला हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मागणी केली गेली आहेत
..समाधआन बागल
-संस्थापक अध्यक्ष हिंदूधर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक




