Home Breaking News शेगावमध्ये तरुणीला केलं ब्लॅकमेल..घटनेचा पर्दाफाश होताच आरोपी गजाआड, ‘लव्ह जिहाद’ अन् बरंच...

शेगावमध्ये तरुणीला केलं ब्लॅकमेल..घटनेचा पर्दाफाश होताच आरोपी गजाआड, ‘लव्ह जिहाद’ अन् बरंच काही..

साप्ताहिक भूमीराजा कार्यालयीन प्रतिनिधी :- अंकुश गिरधर वानखडे

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच बुलडाणा जिल्ह्यातही एका तरुणीवर अत्याचार करून ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेगाव शहरात लव्ह जिहादचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. शेगावच्या 21 वर्षीय तरुणीला फोनद्वारे सतत संपर्क करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद शाकीर वय (26) ला अटक केली आहे.अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते *सनी जंजाळ* यांना या घटनेबाबत माहिती मिळाली.त्यानंतर त्यांनी तत्काळ शेगाव येथे जाऊन स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपीने पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला सतत फोन व संदेश पाठवले,असं तक्रारीत म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी दोघांची भेट झाल्यानंतर आरोपीने तिचे काही फोटो व व्हिडिओ काढले, असाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला ब्लॅकमेल केलं,अंसही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबल उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलीस कारवाई 

अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते सनी जंजाळ यांना या घटनेबाबत माहिती मिळाली.त्यानंतर त्यांनी तत्काळ शेगाव येथे जाऊन स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.शेगाव पोलीस स्टेशन येथे तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित आरोपीविरोधात ॲट्रॉसिटीसह अत्याचाराच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव सत्र न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या मोबाईलमधील डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या संबंधीत काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असंही त्यांनी नागरिकांना सांगितलं आहे.

तसेच सामाजिक कार्यकर्ता सनी जंजाळ यांनी मोठं आवाहन केलं आहे. पालकांनी मुलींच्या हालचालींकडे लक्ष द्यावे.तसच मुलींनीही सतर्क राहावे, असं आवाहन त्यांनी केलं होतं. गेल्या काही दिवसांत अकोला व बुलढाणा जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र,पोलीस प्रशासनाने कायदेशीर चौकटीत कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.आता राज्य सरकार या विषयावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleजलंब येथे आज टाळमृदुंगाच्या गजरात साजरी झाली छत्रपती शिवरायाची जयंती..
Next articleकुंभमेळाच्या धर्तीवर रामकुंड पंचवटी अहिल्याघाट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे वंशजा कडून मागणी