Home Breaking News वादळी वा-यासह पावसाचा कहर..

वादळी वा-यासह पावसाचा कहर..

👉 शेतक-यांच्या पिकाचे मोठे नुकसान

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेडदिनांक- 31 मार्च 2026

हिमायतनगर तालुक्यासह जिल्हयात ठिकठिकाणी निसर्गाचा प्रकोप सुरु आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे पिवळे सोने हळदीसह, हरभरा, गव्हु, टाळकी ज्वारी, कांदा, तिळ आदि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हयात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला होता..अगदी त्याप्रमाणे हवामान अंदाज खरा ठरला..आणी सोमवारी रात्रीला वादळी वा-यासह पावसाने तुफान बॅटींग सुरु केली…यामध्ये पुन्हा एकदा शेतक-यांवर या पावसामुळे संकटाची मालीका दिसुन आली.. या पावसामुळे घरावरील पत्रे उडाल्याने नागरीकांना जिव मुठीत घेऊन मुलाबाळासह रात्र काढावी लागली…

हळद पिकाची काढणी झाली असुन उकळनी, सुकवणी सुरु आहे..हळद सुकविण्यासाठी शेतात शेतकरी रात्री बे रात्री शेतात जागल करीत आहेत. वादळी वा-यामुळे हळदी वरील पावसामुळे हळदीचे संरक्षण व्हावे यासाठी मोठमोठ्या कापडी मेनकापड अंथरुण ठेवले होते…वा-याचा वेग प्रंचड असल्याने कापडी फा-या उडुन गेल्या आणी पावसाने शेतक-यांचे पिवळे सोने पावसात भिजले… शासनाने त्वरीत पंचनामे करुन शेतक-याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे..

*कृषि विभाग झोपेतच*

कृषि विभागाचा गावपातळीवरील मुख्य कर्म-यासह शेतक-यांना भेटी देऊन पावसासंबंधी माहिती देणे अपेक्षित असतांना तसे दिसुन आले नाही…

Previous article* भोंदू बाबांच्या नवं नव्या प्रकरणातून काय शिकावे..?? 
Next articleनाशिक लेडीज सर्कल व राउंड टेबल इंडिया यांच्या मार्फत डॉ. भा. वि. जोशी महाराष्ट्र हाय स्कूल या शाळेत प्रयोग शाळा साहित्य वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न