————————————
अनु जातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्यावर महाराष्ट्रातील मातंग आणि बौद्ध यांनी आपसात भांडावं आणि मग आरक्षण संपवणं सोपं होतं हा मनुवादी षढयंत्राचा भाग आहे….!!
अत्यल्पसंख्याक ब्राह्मणांना बहूजनांवर राज्य करण्यासाठी बहूजनांची ऐकी आड येत होती म्हणून ब्राह्मणांनी धर्माचे ठेकेदार बनून जाती जन्माला घातल्या, काही जाती प्रबळ झाल्या तरी आपल्या साम्राज्याला धक्का पोहचू शकतो या भीतीपोटी पाताळयंत्री ब्राह्मणांनी साडेबारा पोटजाती निर्माण करुन बहूजन समाजाचे असंख्य तुकडे केले अशाप्रकारे “फोडा आणि राज्य ” करा या मंत्राचा जप करीत हजारो वर्षे इथल्या बहूजनांवर ब्राह्मणांनी भेदनितीने राज्य गाजविले आहे. हा आपला इतिहास आहे….!!
हजारो वर्षे गांजलेल्या समाजाला स्वतंत्र भारतात सन्मानाने माणूस म्हणून जगता यावे यासाठी संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ३४०-३४१ आणि ३४२ ही कलमे लिहितांना सामाजिक दृष्ट्या समान भेदाचे शिकार झालेल्या जातींच्या समुहाचा एक एक प्रवर्ग तयार केला आणि त्यांना आरक्षण दिले…!!
संविधानाच्या ३४०व्या कलमानुसार जे सामाजिक दृष्ट्या मागास राहिले ते ओबीसी ठरविले गेले .वर्ण व्यवस्थे मध्ये ते शुद्र होते. ऊच्च वर्णिय वरच्या तीन वर्णाची सेवा करणे हाच त्यांचा धर्म. सांसदीय लोकशाही मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना ओबीसी ठरविले त्यांनाही इतरासारखे हक्क आणि अधिकार हवेत ही भुमिका संविधानाने घेतली….!!
इतिहासातील शुद्रांचे पाताळयंत्री ब्राह्मणांनी ६७४५ जातीत तुकडे करून त्यांची शक्ती, युक्ती ,सामर्थ्य आणि ऐकी संपवून टाकली आणि त्यांच्या कडून हजारो वर्षे सेवा करुन घेतली व स्वतः मेवा खातं राहिले…!!
ओबीसी बहुजनांना आरक्षण मिळतं राहिले तर आपल्या पूर्वजांना जसा फुकाचा नोकर मिळतं होता तसा सेवा करणारा फुकटचा सेवाधारी वर्ग मिळणार नाही. आणि नोकरी मधील आपल्या मुलांची संधी ओबीसी घेईल, प्रशासनात ओबीसी,अनु जाती,जमातीचा शिरकाव झाला तर ते समतेचा आग्रह धरतील आणि आपलं साम्राज्य धोक्यात येईल हा तोटा दूर करण्यासाठी ब्राह्मणी व्यवस्था आरक्षणाला विरोध करतेय…!!
३४१ व्या कलमात अनु जातीचे जे ५९ तुकडे ब्राम्हणी व्यवस्थेने केले होते त्यांना एकत्र करून एस. सी. हा एक प्रवर्ग तयार करण्यात आला आणि ते आरक्षणाचे हक्कदार झाले…!!
ब्राह्मणी व्यवस्थेने ओबीसी, अनु जाती, जमाती मध्ये जातीच्या नावावर भारतीय समाजाचे अनेक तुकडे करून समाज दुभंगलेला ठेवला आणि त्याचा फायदा घेतं आपलं साम्राज्य निर्माण केलं…!!
संविधानाने ३४०-३४१-३४२ या कलमाद्वारे समाजातील समदु:खी जाती समुहाचे तुकडे जोडून एक प्रवर्ग तयार केला. त्याला ओबीसी,अनु जात, अनु जमात असे नामाभिधान केले आणि त्याला आरक्षण घोषित केले…!!
ब्राह्मणी व्यवस्थेने वर्ण व्यवस्था असो की, जातीय व्यवस्था असो समाजाचे तुकडे करून भेदभाव जीवंत ठेवतं आपलं साम्राज्य अबाधित ठेवलं.परंतु संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती जोडून, जोडून एकसंघ प्रवर्ग तयार केला.समदु:खी समाज घटकांमध्ये ऐकी निर्माण झाली पाहिजे हा अतिशय जीवनदायी प्रयोग केला…!!
ज्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ५९ जाती चे तुकडे जोडून सर्वांना एका ताटात बसून एस. सी चे १३% आरक्षण दिले. त्या दिवशी तुम्ही समदु:ख्खी होते त्या कारणाने तुम्ही भाऊ भाऊ झाले….!!
ब्राह्मणी व्यवस्थेने जातीच्या नावाखाली तुमचे तुकडे करून तुम्हाला अवर्ण,अस्पृश्य असे हीन दर्जाचे ठरवून तुम्हाला गुलाम म्हणून वागणूक दिली हा इतिहास परत सांगायची गरज आहे का.??
ज्यांनी तुमच्या मध्ये जातीच्या नावावर भेदरेषा निर्माण केली आणि तुम्हांला गुलाम म्हणून वागविले, त्याच ब्राह्मणी व्यवस्थेचं राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रातील मातंग चेकाळला अशी बौद्ध बांधवांची धारणा होतं आहे…!!
पुर्वीच्या काळात जातीच्या नावावर दुही केल्या गेली. आता आरक्षणातील वाटा किती मिळतोय म्हणून दुही मागविण्याचा प्रयत्न ब्राह्मणी डोकं करीत आहे…!!
१३% आरक्षणाचे ५९ तुकडे झाल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल.? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्या दिशेने एस. सी. मधील प्रत्येक जातीने सखोल विचार केला पाहिजे…!!
आहे ते १३% आरक्षण योग्य रीतीने राबविले जातं नाही. ५९ तुकडे झाल्यावर एस. सी. च्या आरक्षणाची काटेकोरपणे योग्य अमलबजावणी होईल याची शाश्वती काय.??
मातंग बांधवांनो आपणं १३% आरक्षणातील मोठा वाटा मिळविण्यात अपयशी ठरलो असेल तर दोष कुणाचा.? शिक्षण व्यवस्था, नोकरी मधील जागेचे नियोजन महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांच्या हातात होते का.? महाराष्ट्रात आता पर्यंत आरक्षणाची अमलबजावणी करणारे कोण होते,?
एस. सी. साठी राखीव असलेल्या जागेवर कमी गुण घेऊनही बौद्ध लागला आणि मातंगावर अन्याय झाला असे उदाहरण असेल तर सांगा….!!
तुम्ही आपसात भांडतं रहावे हाच ब्राह्मणी अजेंडा आहे.
आरएसएस भाजपा किंवा प्रस्थापित मनुवादी राजकीय पक्षांच्या नादाला लागून आरक्षण संपवण्याचं काम करणाऱ्या एस. सी. मधील स्वार्थी बांधवांनो लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या गुलामीत ढकलतं आहात…!!
एकदा वर्णव्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला हजारो वर्षे कुणीही मोडू शकलं नाही. शुद्र आणि अवर्ण गुलाम म्हणून वागविले गेले कित्येक पिढ्या पशुहून हीन जगण्यात बर्बाद झाल्या…..!!
वर्ण व्यवस्था जाऊन जाती व्यवस्था आली तरीही ओबीसी, अनु जाती जमाती समुहाचं हीन दर्जाचं जगणं बदललं नाही. परंतु संविधानातील ३४०-३४१-३४२ कलमानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती जोडून तुम्हाला माणूस म्हणून मान्यता दिली. असे सामाजिक बदल हजारो वर्षानंतर होतात ते महामानवांच्या कर्तृत्वामुळे घडून येतात. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातं जोडली मजबूत प्रवर्ग तयार केला, त्याचे पुन्हा तुकडे होणार नाहीत याची दक्षता घ्या…!!
तुमचे तुकडे करून तुमच्या वर राज्य करणे हा बामणी कावा आहे. तुम्हाला माणूस म्हणून मान्यता देतं समतेचा हक्कदार बनविणे हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा परिपाक आहे…!!
पुन्हा गुलाम म्हणून आपल्या नातवंडांना समाजात ढकलायचे की, माणूस म्हणून ऊभं करायचे यापैकी एक पर्याय निवडावा लागेल…!!
भावा एका ताटात बसून घास मोजणारी तुझी हीन वृत्ती आहे ते ताट काढून घेण्यासाठी मदतगार सिद्ध होईल आणि तुझ्या पुढच्या पिढीला नरकात लोटणार हेही लक्षात घे…!!
भावा १३% पैकी मला किती मिळालं.? हा प्रश्न इतरांना विचारण्यापेक्षा मी किती मिळविण्यात यशस्वी झालो हा सकारात्मक आणि प्रयत्नवादी विचार का करीत नाही.??
कुठलेही प्रयत्न न करता तुला आरक्षण मिळालं म्हणून तुला त्याचे मोलं कळतं नसेल तर तु कमालीचा दळभद्री आहेस असेच म्हणावे लागेल….!!
थोड्याशा लाभासाठी खात्या ताटाला लाथ मारु नको. आरक्षणातील ऊपवर्गीकरण हे तुझ्या पुढच्या पिढीला गुलाम बनविणारं षढयंत्र आहे…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.




