भूमीराजा न्यूज/प्रतिनिधी संतोष मोरे
बाळापूर :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अकोला अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष, बाळापूर मधील आनंद महिला प्रभागसंघ देगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) घेण्यात आली. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक अकोला मा.श्री. नरेंद्रजी काकड सर , माजी सभापती पंचायत सामिती बाळापूर श्रीमती. शारदा सोनटक्के ताई, माजी सरपंच श्रीमती. दिपाली राजेश सरदार ताई, वन सखी सेंटर, अकोला च्या ऍडव्होकेट राखी वर्मा मॅडम, दामिनी पथक प्रमुख कावेरी वेताळ मॅडम, आनंद महिला प्रभागसंघ अध्यक्षा श्रीमती रेखा इंगळे, सचिव कमलाताई भिवटे, कोषाध्यक्षा वनमालाताई सांगोकार, तालुका अभियान व्यवस्थापक बाळापूर श्री. नितीन हरणे, श्री. अनिकेत देशमुख, बार्शीटाकळी, तालुका व्यवस्थापक श्री. घनश्याम धनोकार, श्री. भूषण देशमुख, प्रभाग समनव्यक भावना चिंचोलकर, गोपाल भाकरे, रमाकांत पिल्ले, सोनाली बोरसे, मनीषा खराटे, ग्रामसखी, प्रभागसंघ-ग्रामसंघ पदाधिकारी, स्वयं सहायता समूह सदस्यां मोठया संख्येने उपस्तित होत्या. कार्यक्रमांची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने केली, मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी एम एस आर एल एम प्रेरित आनंद महिला प्रभागसंघ देगाव यांचा वार्षिक लेखा जोखा मांडण्यात आला त्यावेळी स्थापने पासून (16.01.2020) आज पर्यंत एकूण 806073 रुपये नफा झालेला असून मागील (2025-26) वर्षात 4,88,832 रुपये नफा झालेला आहे, सदर प्रभागसंघ आर्थिक व्यवसाय विकास सोबत धोरणत्मक निर्णय घेण्यास तत्पर आहे असे मत लिपिका राधिका गोतमारे यांनी मांडले, विविध प्रकारचे कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांची प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सोबतच गाव पातळीवर कार्यरत ग्रामसखी यांनी उल्लेखनिय कामगिरी केलेल्या कॅडर यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. पोलीस यंत्रणातील कॉन्स्टेबल यांनी चिडीमार विरोधी आवाज उठवावा याबाबत आव्हान केले, वन स्टॉप सेन्टर अकोला याच्या वकील मॅडमनी कायदेविषेयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया इंगळे व नताशा सुरवाडे यांनी तर आभार रमा इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भावना चिंचोलकर, सुनील सुरवाडे, दिपाली म्हैसने, अनिता इंगळे, सविता रेवस्कर, अंजली राऊत, साधना सिरसाट, आरती पळसकार, अश्विनी दांदळे, रंजना घोगरे, वंदना घोगरे, दुर्गा मिरगे, प्रियंका महानकर, जयश्री अंभोरे, वर्षा उपर्वात, संगीता खरात, शांता तायडे, प्रमिला पिलात्रे, माया सुरवाडे, तुळसा सरदार आणि सर्व समूह सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.



