भूमीराजा न्यूज प्रतिनिधी / संतोष मोरे
बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील प्रतिक पाटील यांच्या २८ एप्रिल २०२६ रोजी विवाह होता परंतु हे नियतीला माण्य नव्हता. रोजच्या प्रमाणे लोहारा येथील नागरिक सकाळी उठून आपले काम करीत असताना एक बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली बाळु पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील यांच्या लोहारा शेगाव मार्गावर अपघात झाला. हे माहित मिळताच लोहारा गावातील सामाजिक कार्यकर्ते रुपेश ठाकुर व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन शेगाव येथील साईबाईमोट्य रूग्यणालय येथे दाखल केले. परंतु डोक्याला मोठ्या प्रमाणात दुःखा पत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी अकोला पाठवले. अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना दिनांक ६ , ५, २०२६ रोजी जीवनाची जोत मावळली. आपला एकुलता एक मुलगा गेल्याने पाटील कुटुंबावरती दु:खाचा डोंगर कोसळला प्रतिक पाटील यांच्या दु:खत निधनाची बातमी बाळापूर चे लोकप्रिय आमदार नितीन देशमुख यांना कडताच लोहारा येथील पाटील कुटुंबाची सांत्वन भेट घेतली व त्यांच्या कडून जी मदत होईल ते करतील असे शाश्वती दिली. यावेळी उपस्थित म्हणून आमदार नितीन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रुपेश ठाकुर, दत्ता बकाल, राजु बाजोडकर, नरहरी बांदोडकर, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



