(अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी)
बाळापूर:-शहरातील निष्ठावान कार्यकर्ते सामाजिक कामात सदैव अग्रेसर असलेले श्याम बहुरूपे यांची शिवसेना अकोला जिल्हा संपर्कप्रमुख उपनेते गोपीकिशनजी बाजोरिया ,जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील,निवासी उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले,युवासेना जिल्हाप्रमुख निखिल ठाकूर,युवासेना जिल्हाप्रमुख नितिन मानकर ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश मोरे यांनी शिवसेना बाळापूर तालुका सचिव पदी नियुक्ती केली शिवसेनेचे काम तालुक्यात मजबूत करण्याचे तथा शिवसेनेसाठी अहोरात्र झटणार असल्याचे नवनिर्वाचित शिवसेना तालुका सचिव श्याम बहुरूपे यांनी सांगितले त्यांच्या या निवडीने मित्र परिवाराने आनंद व्यक्त केला श्याम बहुरूपे यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप,निवाशी उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले,युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मानकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश मोरे यांच्या सह आदींना दिले आहे



