Home Breaking News श्री रामांच्या पवित्र भूमीत विश्वशांती चा हास्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात...

श्री रामांच्या पवित्र भूमीत विश्वशांती चा हास्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला….

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070

हास्य दिंडी

हास्य दरबार

गेट टुगेदर

वनभोजन कार्यक्रम एकाच छताखाली ..💃

हास्य जगद्गुरु डॉक्टर मदन जी कटारीया सर यांच्या प्रेरणेतून जागतिक हास्यदिनानिमित्ताने नाशिक शहरामध्ये विश्वशांती हास्ययोग समन्वय समिती तर्फे विविध कार्यक्रम साजरे करून हास्य दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

अध्यक्षा, सौ जयश्रीताई गावित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून, हास्य प्रेमींना मंत्रमुग्ध केले.हास्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून,तपोवनतील जनार्दन स्वामी मठापासून भव्य अशी हास्य दिंडी, हास्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शहरातील सुमारे ४० विविध हास्य क्लबचे सुमारे ८५० हास्य प्रेमी सहभागी झाले होते या हास्य दिंडीत विविध वेशभूषा धारण करून हास्य कलाकार सहभागी झाले होते .त्यामध्ये मल्हारी मार्तंड खंडेराव महाराज बानाई म्हाळसा, श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान, पंढरीचे वारकरी, सीमेचे रक्षण करणारे सैनिक, पाणी वाचवा, गोदावरी स्वच्छता अभियानहास्य फलक राबविणारे फलक विशेष आकर्षण ठरले पाणी वाचवा पाणी आडवा ,पाण्याचा दुरुस्त करू नका ,पाणी वाया घालवू नका आदी बोर्ड रॅलीमध्ये आकर्षण ठरले. सुमारे दोन तास चाललेल्या या रॅलीचा समारोप तपोवन यामध्ये असलेल्या भव्य अशा श्रीराम मूर्तीच्या मागे असलेल्या वनात प्रांगणात करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी

म्हणून नगरसेवक जगदीश भाऊ पाटील ,नगरसेवक, शीलाताई भागवत छायाताई देवांग, वंदनाताई पाटील, पुष्पाताई, आव्हाड, विश्वशांती हास्यक्लबचे मार्गदर्शक दीपक जी नागपुरे,

विश्वशांती हास्य क्लबच्या संस्थापक अध्यक्ष सौ जयश्रीताई गावित आदि उपस्थित होते. अश्विनीताई धोपावकर, राजेंद्र भंडारी, भारतीताई चौधरी, लता वाघ, श्री ब्राह्मण कर सर यांनी हजेरी लावली. तसेच हास्य दिनानिमित्त अध्यक्ष जयश्रीताई गावित यांनी विश्वशांतीतून हास्य योगा व हास्यातून आरोग्य, हा महत्वपूर्ण संदेश देऊन, मुक्त जीवन शैली, यावर आपले मनोगत व्यक्त केले.

नगरसेवक जगदीश भाऊ पाटील

म्हणाले की ,हास्य हे एक औषध असून आपण सर्वजण ते औषध नियमितपणे घेत असल्यामुळे आज आपण हास्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करू शकतो असेच आपण नेहमीच हसत राहिलास आपण पुढील 25 वर्षा नंतरही हास्य दिन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करू यात शंका नाही. तर प्रमुख अतिथी पुष्पाताई आव्हाड यांनी पुढील वर्षी हास्य दिन इंदिरानगर भागात मोठ्या आनंदाने साजरा करण्याबाबतचे आवाहन आयोजकांना केले.

तपोवनातील गर्द हिरव्या झाडीमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला.

तरूण व तडफदार समजदार,विश्वशांती हास्ययोग समन्वय समितीच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित यांच्या संकल्पनेतून गेल्या 25 ते 30 वर्षापासून हास्य चळवळ पुढे येणाऱ्या तीन ज्येष्ठ हास्य सेविकांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यात आदरणीय मंजिरी ताई वैद्य ,आदरणीय जयश्रीताई दामले ,आदरणीय सुहासिनीताई वाघमारे

यांचा स्मृतीचिन्ह, शाल, बुके पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हास्य दिनानिमित्त, पुरस्कारांची व बक्षिसांची लय लूट करून हास्य योगीना आनंद देण्यात आला.

हास्य,योगिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून शहरातील विविध ठिकाणावरून आलेल्या हास्य क्लबच्या सदस्यांनी विविध संस्कृतीक कार्यक्रम सादर केले.

सुमारे दोन तास चाललेल्या या संस्कृती कार्यक्रमाचे परीक्षण श्रीमती चंद्रकला जोशी ,उषा कदम , प्रथमा पुंडे व वंदनाताई नागवंशी यांनी केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमात सोळा वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतच्या हास्य सदस्यांनी सहभाग नोंदविला. पाणी वाचवा पाणी जिरवा पाण्याचे महत्व, गोदावरी नदीचे स्वच्छता, देवाची गाणी, देवीचे गोंधळ ,खंडेरायाचा गोंधळ हिंदी ,मराठी चित्रपटांमधील विविध गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले.

यानंतर हास्य क्लब मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल हास्य क्लबचा सत्कार स्मृतीचिन्ह शाल, पुष्प देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सीमाताई देवदास अरुण गायकवाड यांनी केले., तर मंजू गायकवाड व सोनवणे दादा यांनी उत्कृष्ट फोटो ग्राफी केली., शेवटी सर्व हास्यप्रेमींसाठी रुचकर व नॅचरल वनभोजनाचे आयोजन करण्यात. विश्वशांतीच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित , यांच्या अध्यक्षीय कारकीर्द पहिला यशस्वी व सुपर डुपर कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री दीपक जी नागपूरे सर यांनी सगळ्यात जास्त मेहनत घेतली. अध्यक्ष सौ जयश्रीताई गावित साधना चव्हाण सीमा देवदास, मनोज भावसार , अरुण गायकवाड स्वप्नालीताई पंडित,विजय पाटील ,माई बुचके ,सुमन भदाणे, उमेश श्रीवास्तव, सरला नेरकर, हिरामण झोटिंग, दिगंबर जाधव सुनिल नागरे,छाया थोरात, चित्रा भावसार लता ताई वझरे, अरुणा भामरे ,मीराताई, विद्याताई निकम अरुण गायकवाड, रमेश वानखेडे, युवराज थोरात , देवदास सर, शेखर ढेपे ,वसंत पंडित, , राजश्री कापुरे , राणी तळेकर, सावित्री कासार,लताताई सोनार निर्मला आहेरराव, सुनंदा चोधरी, कल्पना सोनवणे, विठाबाई,रुपाताई,अलका निवणकर सुनीता घोडके आदींनी व संपूर्ण टीमने लाखमोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आकर्षण सर्वे सर्व श्री दीपक नागपुरे सरांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरला.असा हा विश्व शांती हास्य योग समन्वय समिती चा अलोभनीय, सांस्कृतिक सोहळा न भूतो न भविष्यतो असा साजरा करण्यात आला. योग्य नियोजन, सूत्रबद्ध शिस्त, कार्यक्रमात बघायला

मिळाली. अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित यांनी आयोजित केलेल्या या पहिल्या कार्यक्रमात हास्य प्रेमींना आनंदाचे चांदणे दिले.सकाळी सहा पासून, हास्य प्रेमींचा किलबिलाट गजबजलेला होता. कार्यक्रमाला प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळाला व ही तपोवन भूमी या कार्यक्रमामुळे संपूर्ण उजळून निघाली. यानिमित्ताने प्रभू रामचंद्राच्या भव्य दिव्य अशा मूर्तीचे दर्शन सगळ्यांना घडले.

सगळे क्लब एकमेकांना भेटले, एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला, हसले, नाचले व मनमुराद आनंद घेतला.असा हा सोहळा सुपर डुपर उपर झाला.

 

Previous articleपेरकेवाड, पेरकी समाजाच्या बैठकीचे नांदेड येथे आयोजन.
Next articleअहो..आश्चर्यम…यंदाची हिमायतनगरयेथील खरीपपुर्व बैठकीचे नियोजन एका कृषि विभागाच्या विविध योजना घेणा-यांच्या सदन शेतक-याच्या शेतात तेही चक्क पाच किलोमीटर दुरवर….