हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
पंचवटी येथील तारवाला नगर मधील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे सदर व्याख्यानमालेची सुरुवात दिनांक 20 मे 2025 रोजी प्रभागाचे माजी नगरसेवक जगदीशभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे अशी माहिती व्याख्यानमाला समिती प्रमुख अरुणदादा गायकवाड यांनी दिली
मंगळवार दिनांक 20 मे रोजी प्रसिद्ध अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर यांच्या फिल्मी कला विश्वातील प्रवास* या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
21 मे 2025 बुधवार रोजी नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस एडवोकेट नितीनजी ठाकरे यांचे कायदेविषयक मार्गदर्शन होणार आहे 22 मे गुरुवार रोजी नाशिक येथील प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ व समाजसेविका डॉक्टर निवेदिता पवार* यांचे आनंदी व निरोगी जीवनाची गुरुकिल्ली
या विषयावर व्याख्यान होईल याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती हेमलता ताई बिडकर* या उपस्थित राहणार आहेत 23 मे रोजी यशदा पुणे या संस्थेचे प्राध्यापक व सेवानिवृत्त अधिकारी नागरी संरक्षण दल शैलेश अनंत नाईक यांचे युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी व आपत्ती निवारण या विषयावर व्याख्यान होईल तर शनिवार दिनांक 2025 रोजी नाशिक शहरातील प्रसिद्ध *गुंजन* या ऑर्केस्ट्रा मधील प्रसिद्ध गायकांचा सदाबहार गीतांचा सुरीला कारवा* हा कार्यक्रम होणार आहे तरी नाशिक मधील नागरिकांनी या पाचदिवशीय व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे करण्यात आले आहे सदर व्याख्यानमाला दररोज सायंकाळी सहा वाजता राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल, छत्रपती संभाजी चौक, तारवाला नगर,पंचवटी, नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी अरुण गायकवाड,अशोकनाना कोतवाल ,अशोक जगताप, स्मिताताई माशाळकर,प्रतिभाताई गायकवाड,राजेश मसदे,भा.रा. सूर्यवंशी, शेखर ढेपे, कल्पनाताई मोरे, अरविंद ब्राह्मणकर आदी प्रयत्नशील आहेत