Home Breaking News  वैवाहिक आयुष्याची नांदी : संस्कृती- रिती रिवाज व पंरपरे च्या उंबरठ्यावर समन्वयाची...

 वैवाहिक आयुष्याची नांदी : संस्कृती- रिती रिवाज व पंरपरे च्या उंबरठ्यावर समन्वयाची क्रांती!

हुंडा आणि त्या पलीकडे 

एकेकाळी हुंड्यासाठी छळ केला या ४९८ कलमाने मोठा हाहाकार उडविला होता.४९८ च्या धमकीनेचं बरेचं जण गारद व्हायचे,तरी सुद्धा असे प्रकार घडायचेचं ,या सर्व कायदे वा विवाह संस्थाची कड़क अमलबजावणी केली तर हुंडाबळी वा कौटुंबिक नवरा बायकोचे टोकाचे वाद

संपूष्टात येऊन सगळयांच्या संसारात आनंदी आनंद निर्माण होईल या विचारांच्या विंवचनेत असणारांनी ,यावर ताव आणुन समाज माध्यमांवर व्यक्त होणारयांनी हे का घडतं,? कोण घडवतं?,कशामुळं घडतं, ?याच्या मूळ कारणांचा शोध घ्यायला पाहिजे,वरकरणी हुंड्यासाठी बळी गेलेली वैष्णवी ही काही पहिली तरुणी नाही ग्रामीण,शहरी,निमशहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या,गरीब मध्यमवर्गीय,व ज्यांच्या रडण्याचा तर सोडाचं पंरतु दिवाळी सणावेळी फटाके मिळत नाही म्हणून न फुटलेल्या फटाक्यातील दारु गोळा करुन तीला पेटवून समाधानी होणाऱ्या अंत्योदय गरीबी रेखा असलेल्या कुटुंबासह अशा देश भरातील सत्तर टक्के कुटुंबाचा अभ्यास केला तर

हुंड्यासाठी छळ अशा सुमारे हजार केसेस जमा होतील,पण हा बळी फक्त हुंडा या एका कारणासाठीचं जातो का की यामागे अजुन काही कारणे आहेत , त्यात खरे कारण काय असावे याचा शोध घ्यायला सुरुवात करावी लागेल . प्रत्येक फिर्यादीने ठराविक साच्यामध्ये स्पष्टपणे हुंड्यासाठी छळ हे कारण सांगितले. आरोपींकडुन त्याच केस बद्दल हुंड्या शिवाय वेगवेगळी असंख्य कारणे सांगितली जातात. माझ्या दृष्टीने तपास करणारा अधिकारी हा त्रयस्थ म्हणून निपक्षपाती असल्याने रेकॉर्डवर आणता आले नाही तरी भांडणाचे खरे कारण काय हे त्याला समजते. ते नोंदविण्यात येत नाही कारण त्यांना दाखल झालेल्या रिपोर्ट नुसार तपास करावा लागतो. दुर्दैवाने सगळी खरी माहिती गोळा होत नाही तरी परंतु जी माहिती पुढे येईल ती आश्चर्यकारक असणार यात तीळमात्र ही शंका असणार नाही

निव्वळ हुंड्यासाठी छळ केला या ऐवजी 70 टक्के कारणे ही लैंगिक (sex) स्वरूपातील असतात पण याविषयीचं सत्य मांडायला कोणी धजावणार नाही. लग्ना पूर्वीची अफेयर्स, लग्नानंतरही इतरांच वाटणार आकर्षण पण प्रत्यक्षात व्यक्त होता येत नाही म्हणून होणारी घुसमट,घरातील वडीलधारया मंडळीचं असलेल बारकाईपूर्व लक्ष,पुढे अनिष्ट काही होई नये म्हणून अर्थपूर्ण निर्रथक वाटणारी बड़बड़,त्यातुन निर्माण होणारी तु तु मैं मैं ,चिड,द्वेष,अनेक कारणामुळे येणारी शारीरिक दुर्बलता,व्यसनाधिनता अशी भाराभर कारणे पुढे येतील याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही, शिक्षितांकडुन अपेक्षा आहेत पण ते तर अशिक्षित पेक्षाही निर्बुद्ध पणे वागतांना दिसतात आजचे जे आई बाप आजोबा आजी आहेत ते मूळच्या कृषी संस्कृतीतील. जिथे कुटुंबाचा सन्मान हा केंद्रस्थानी असतो. व्यक्ती दुय्यम असते . त्याकाळी कुणी हुंडा मागितला नाही व दिला नाही तर दोघाबद्दल समाज संशयाने पाही. जेवणावळीच्या किती पंगती उठल्या तर‌ आहेरात किती भांडी आली याचे प्रदर्शन वर वधु दोन्ही कुटुंबात श्रेष्ठत्वाचं लक्षण समजल्या जाते पूर्वी संसार बाटली,हांडे व इतर भांडी तर ९० च्या दशकात बेड,गादी,कपाट सधन घर असेल तर सोन्याचे दागिने अंगूठी,गोफ,इथप्रयंत आलेला प्रवास हा २०१० च्या दशकाप्रयंत यामध्ये फ्रीज,टिव्ही,शोकेस इथप्रयंत येऊन पोचला व हाच त्या कुटुंबाचा आत्मसन्मानाचा भाग असायचा. पण आजच्या काळात लग्न पत्रीकेमध्ये आहेर स्विकारल्या जाणार नाहीत , सामान्य पद्धतीने विवाह करणारयांच प्रमाण हळुहळु का होईना वाढत आहे ही सामाजिक वैचारिक बदलाची बाब मनाला समाधान देते, पूर्वी काळी शिक्षणाला महत्त्व नसल्याने मुली कॉलेजमध्ये शिकत नसत. त्यामुळे तरुण-तरुणी मधील संवादाला संधीच नसे. आमच्या काळी वर्गातील मुलं-मुली एकमेकांशी बोलत नसत. औद्योगिक संस्कृती वाढीस लागली. इंटरनेटमुळे इतर बाबीसह लैंगिक माहितीचा पूर आला.मुला मुलींना बॉयफ्रेंड,गर्लफ्रेंड हा प्रतिष्ठेचा विषय वाटायला लागला,हे नसणे म्हणजे मागासपणाचं लक्षण समजल्या जाते, पूर्वी प्रेमात काडीमोड झाला की रडणं असायचं अतीव दु:ख व्हायचं मन हळवं असायचं,,आज ब्रेक अप झाल की ब्रेक अप पार्टी धडाक्यात साजरी केली जाते,यावरून कड़ाही प्रमाणात तरुणाईचं मन खंबीर झाल्याचा प्रत्यय येतो, लाईफ पार्टनर, विवाह पूर्वी चं शूट,विवाह या बद्दलचे विचार अमुलाग्र बदलले आहेत. आजची विवाह पद्धती खरोखरच आदर्श आहे का याचा विचार करायचं असेल तर वि.का. राजवाडे यांचे ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हे पुस्तक अवश्य अभ्यासले पाहिजे. आज असलेली विवाह पद्धती हीच सनातन काळापासून चालू होती असे मुळीच नाही.

विवाहाबद्दल भारतीय पुरुषांच्या काय कल्पना आहेत या बद्दल लेखक विश्राम बेडेकर यांनी लिहिले होते की ‘पुरुषाला घरकामासाठी आफ्रिकन ब्लॅक स्री,बौध्दिक चर्चेसाठी ब्रिटिश तरुणी, रोमान्स साठी फ्रेंच तरुणी,….,हवी असते. त्यावर उत्तर देताना त्यांची पत्नी प्रसिद्ध लेखिका मालती बेडेकर यांनी उत्तर दिले होते की भारतीय स्री ला द्रौपदीप्रमाणे धर्मा सारखा विचारवंत, भीमा सारखा बलदंड, अर्जुन सारखा शूर, नकुल सारखा देखणा,सह सहदेव सारखा समजूतदार नवरा हवा असतो. या दोघातील खरे कोण खोटे कोण?

हा भाग बाजुला ठेऊन स्त्री व पुरुषी मनाची,विचारांची ही वास्तविकता आहे का? यावर मंथन होणे गरजेचे आहे,

आणि हे वास्तव नसेल तर उत्तम पण जर हे असचं जर वास्तव असेल तर मग यावर नक्कीच उपाय शोधावे लागतील,उपायामधुन फक्त आदर्शसहिंता निर्माण करुन चालणार नाही, निर्माण झालेल्या सहिंतेच पालन होइलचं याची शाश्वती नाही, मनाची मानसिक संहिता निर्माण करावी लागेल,

चिंपांजी सारख्या वानरापासून उत्क्रांत झालेल्या आधुनिक मानवामध्ये लैंगिकते बद्दलच्या सर्व प्रेरणा जशाच् तशा जिवंत आहेत असे युवाल हरारे सारखे आधुनिक इतिहासकार देखील सांगतात.

त्यामुळे लग्न जमणे आणि टिकणे यासाठी निव्वळ हुंडा कितपत भूमिका बजावतो हे पाहणे चिंतनीय ठरेल. नव विवाहितेच्या छळाबद्दल हुंडा विरोधी प्रचंड कडक एकमेव कायदा असल्याने कायदेशीर कारवाई करण्यासाठी निव्वळ हुंडा हा शब्द कायम वापरला जातो असे दिसते. एवढेचं नव्हे तर शिक्षिता द्वारे जेव्हा कोर्टात फारकत करीता दावा दाखल केला जातों, तेव्हा देखील अशाच आशयाचा मजकुर मोठ्या प्रमाणात दिसुन येतो, मुळ कारणांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्या जातं,

कृषी संस्कृती ही 70 टक्के मनुस्मृती,20 टक्के वारकरी संप्रदाय व 10 टक्के पाश्चिमात्य विचारांवर चालते.

आमची सनातन संस्कृती सर्वश्रेष्ठ व तीच जगाला मार्गदर्शन करेल अशा भ्रमात असलेले सनातनी वाहक आणि मंडळी संस्कृती चा डांगोरा पिटतांना सामाजिक शास्त्रज्ञ, मानव वंश शास्त्रज्ञ,

मानसशास्त्रज्ञ यांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष करतात. लैंगिकतेचा मोठा प्रभाव,समाज समूहातील विविध व्यक्ति च्या आकर्षणाचा मानवाच्या निर्णय प्रक्रियेवर व जगण्यावर होतो हे त्यांना माहीत नसावे.

कृषी संस्कृती च्या दृष्टीने स्त्रियांकडे पाहणारे पालक, समाज हे संस्कृती रक्षक एकीकडे आहेत. पाश्चिमात्य विचार आणि त्यांचा प्रचार,प्रसार करणारे सोशल मीडिया सारखे माध्यम आणि त्यातून निर्माण झालेली औद्योगिक संस्कृती ही दुसरीकडे आहे. या दोन संस्कृतीमध्ये आजची तरुण पिढी अडकलेली आहे.

त्यामुळे हुंडा हा काही आजच्या तरुणाई पुढील प्रमुख प्रश्न नाही. हे प्रथम समाज संरचना चे आम्हीचं ठेकेदार म्हणवणारांनी लक्षात घेतले पाहीजे..

ज्यांना रस्ते,मोठ्या इमारती ,मोठीमोठी स्मारक,काॅंक्रीटीकरण करून यातून काही उभे करणे व आश्वासनं देणे यालाच मानवी विकास करणे असे वाटते त्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न कितपत समजलेला असतो? हाकलून द्या. लिंग कापा. गोळी घाला , बहिष्कृत करा असे आदेश दिल्याने हे प्रश्न संपणार नाहीत.

हुंडा बळी , विवाह न टिकणे याच्या मुळ कारणांचा शोध घेऊन त्यावर सामंजस्यपूर्ण “समन्वय संस्कृती” निर्माण करण्यासाठी कार्य होणे गरजेचे आहे.

सर्व प्रयत्न करून पटत नसेल तर वेगळे व्हावे. इतर पर्याय शोधावे.अशा प्रकार चा विचार करणारयांना मानवीय समूह जिवन व मानवीय मूल्य समजलंच नाही असं दिसतं हा त्यावरील उपाय होऊ शकत नाही कारण याच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यातील पिढीला एकांगी पणाने जिवन जगावं लागेल विवाह , कुटुंब या प्रति त्यांच्यामध्ये चिड निर्माण होईल याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करत आहोत,हे या पिढीला चांगले समजते. बदलत्या संस्कृतीतील विवाह, लैंगिकतेबद्दलचे विचार, दोहोमधील समन्वय,एकमेकाप्रतीचा आदर,सन्मान, वैवाहिक गरजा, कौटुंबिक गरजा,सांसारिक जिवन, घरगुती जिवन,व मानवीय मूल्य कुटुंबातील लोकांनी व समाजांनी समजून घेतले तर यातून आजच्या तरुणाईची मुक्तता होईल. व भविष्यातील येणारया पिढ्यासांठी त्यांचे जगणे खरे सुखी, आनंदी ,समृद्धि बनायला होईल अशा सामाजिक व्यवस्थेच्या मार्गाचा स्विकार करुन त्यावर सामंजस्यपूर्ण समन्वय स्थापित करुन स्त्री पुरुषांमध्ये भेदाभेद न करता

सर्वोच्च कोण , श्रेष्ठ कोण, समझदार कोण, नासमझ कोण,यात फरक न करता समन्वय स्थापित करुन एकमेकाप्रतीचा आदर कायम ठेऊन सारा जगाला हेवा वाटेल असं कौटुंबिक,सांसारीक जिवन जगावं याकरीता समस्त भारतीय जनांना मंगलमय सदिच्छा….

ॲड.पुजा प्रकाश एन.भारत निर्माण आंदोलन अखेरची क्रांती……..२७ मे २०२५

Previous articleअवकाळी पावसामुळे मोलमजुरी करणा-या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर…
Next articleसततच्या मुसळधार पावसामुळे जनजिवण विस्कळीत..