मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 29 जुलै 2025
हिमायतनगर शहरातील हार्डवेआर अॅड मशनरीजचे (शेतीविषयक लागणारे अवजारे) यांचे व्यापारी अतिशय प्रेमळ, शांत, संयमी , तितकेच शेतक-याप्रती आदराने बोलणारे श्यामजी नारायण ( स्वातंत्र सैनिक) मारुडवार यांनी आपल्या उभ्या आयुष्यात समाजसेवाच केली. मानवी जिवनात समाज, समाजातील प्रत्येक माणसाप्रती आपली सेवा समर्पित व्हावी….हाच उद्दात हेतु डोळ्यासमोर ठेवत…हिमायतनगर येथील ज्वाज्वल्य , जागृत देवस्थान श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरात श्रीचे दर्शन घेऊन मंदिरातील आवारामध्ये सुखशांती लाभावी यासाठी येणा- या भाविक भक्तासाठी सढळ हस्ते तिनं खुर्च्यासाठी देणगी देऊन श्रीचरणी अर्पण केल्या आहेत..
या विस हजार खुर्च्याचा लोकार्पण सोहळा हिमायतनगर-हदगांव तालुक्याचे मा. आमदार , लोकनेते माधवराव पाटील जवळगावकर साहेबांच्या हस्ते या खुर्च्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी मंदिर कमेटिचे उपाध्यक्ष महावीरशेठ श्रीश्रीमाळ, मा. सभापती,सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड , सभापती जर्नादन ताडेवाड, तालुका अध्यक्ष सुर्यवंशी, काॅग्रेस शहर प्रमुख माझे मित्र संजय माने, प्रसिध्द व्यापारी गोविंद अप्पा बंडेवार, नितेश जैस्वाल, (उ.बा.ठा. शिवसेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष संजय काईतवाड,) परमेश्वर वानखेडे आदी कार्यक्रर्ते यावेळी उपस्थीत होते..



